अत्याचारानंतर केली हत्या; मृतदेह सापडला रुग्णवाहिकेत .
चंपारण :- बिहार च्या पूर्व चंपारण जिल्ह्यात एका खाजगी नर्सिंग होमच्या डॉक्टर आणि कंपाउंडर्सनी एका नर्सवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पीडिता मोतिहारीयेथील जानकी सेवा सदन नर्सिंग होम मध्ये काम करत होती. आरोपी डॉक्टर आणि इतर कर्मचारी फरार असून पोलिसांनी एका कंपाउंडरला अटक केली आहे.
पीडितेच्या आईने या प्रकरणी डॉ जयप्रकाश दास आणि इतर पाच जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनी नर्सिंग होम सील केले आहे. 30 वर्षीय पीडित महिला विधवा असून तिला चार वर्षांचे मूल होते. पीडितेच्या आईच्या म्हणण्यानुसार, मंतोष कुमार हे डॉक्टर जयप्रकाश दास यांच्यासोबत नर्सिंग होमचे व्यवस्थापन करायचे पीडितेच्या आईने सांगितले की, जावयाच्या निधनानंतर माझी मुलगी क्लिनिकमध्ये काम करायला लागली. काही दिवस काम केल्यानंतर तिने कामावर जाण्यास नकार दिला. विचारपूस केली असता, तिने डॉक्टर आणि इतरांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे सांगितले. त्यानंतर ती त्या ठिकाणी कामावर परतलीच नाही. काही दिवसांनी जयप्रकाश आणि मंतोष कुमार माझ्या घरी आले, त्यांनी माफी मागितली आणि तिला चांगल्या परिस्थिती आणि पगाराचे आश्वासन देऊन कामावर परतण्यास सांगितले.
पीडितेच्या आईने सांगितले की, तिची मुलगी 8 ऑगस्ट रोजी नर्सिंग होममध्ये गेली आणि परत आलीच नाही. नंतर, जयप्रकाश यांनी आम्हाला कळवले की तिची तब्येत खालावली त्यामुळे ती मुझफ्फरपूरला गेली. मात्र, त्यांनी नमूद केलेल्या रुग्णालयात ती आम्हाला आढळली नाही. बराच शोध घेतल्यानंतर आम्हाला माझ्या मुलीचा मृतदेह रुग्णवाहिकेत सापडला. तिच्या आईच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी डॉक्टरसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे मोतिहारीच्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे.
हे पण वाचा
- एरंडोल बसस्थानकावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य; आगार व्यवस्थापकांचे बस स्थानकाच्या स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष.
- पाऊले चालती पंढरीची वाट-चांदसर पायीदिंडीचे एरंडोलला स्वागत स्व. जयवीरबापू पाटील स्मृतीप्रित्यर्थ -गटसचिव संघटना 18 वर्षांपासून करीत आहे अन्नदान.
- “पैसेही गेले आणि बायकोही गेली पुन्हा मी एकटाच”… तीन लाख देऊन आणलेली बायको निघाली एका मुलीची आई; दोन दिवसांत टोळीचा भांडाफोड.
- मेट्रो स्टेशनखाली वडिलांजवळ झोपलेल्या अडीच वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपीचा एन्काउंटर .VIDEO
- तरुणाचे एकीशी प्रेमसंबंध, तिचं दुसऱ्याशी लग्न ठरलं, तरुण गेला जाब विचारण्यास , तेथे झाला वाद पळून घरी येताना तरूणाचा खून करून तो अपघात असल्याचा केला बनाव.