Viral Video:- साडीच्या दुकानातील सेलमध्ये खरेदी करताना दोन महिलांमध्ये झाला राडा,केस अन् कपडे ओढत एकमेकींना धू-धू धुतले, पाहा व्हिडीओ

Spread the love

Viral Video:-भांडणाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच एक असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात सेलमध्ये साडी करताना दोन महिला एकमेकींशी भांडताना दिसत आहे. यामध्ये या महिलांनी एकमेकांचे केस ओढून मारताना दिसत आहे, त्यामुळे दुकानात एकच गोंधळ उडाला आहे. कोणत्याही दुकानात किंवा मॉलमध्ये साड्यांची विक्री होत असेल तर विशेषत: महिलांची फार गर्दी जमते.

या खरेदीदरम्यान महिलांमध्ये अनेकदा भांडण होतात. कधी- कधी हे भांडण इतके टोकाला जाते की, त्याचे हाणामारीत रुपांतर होते. असाच काहीसा प्रकार व्हिडीओमध्ये पाहायल मिळत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका दुकानात काही महिला साड्या खरेदी करताना दिसत आहे. त्याचवेळी त्यांच्या पाठीमागे असलेल्या दुसऱ्या काउंटरवर दोन महिला एकमेकांशी भांडताना दिसत आहे. यावेळी एका महिलेने दुसऱ्या काउंटरवरुन साडी उचलून पहिल्या काउंटरच्या दिशेने फेकली, यानंतर दोघींमध्ये बाचाबाची झाली, यानंतर दोघींनी एकमेकींचे केस आणि कपडे ओढून मारहाण केली.

व्हिडीओमध्ये पुढे दिसत आहे की, एक पोलीस शिपाई या दोन महिलांची भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतो. मात्र दोघीही एकमेकींचे केस सोडण्यास तयार नसतात. यानंतर तिथे उभ्या असलेल्या इतर महिला आणि पुरुषांनी त्यांना एकमेकांपासून वेगळे करत भांडण सोडवले. एक मोठ्या हॉलमध्ये ही साडी विक्री सुरु असल्याचे दिसत आहे. ज्याच्या आत साड्या खरेदीसाठी अनेक काउंटर आहेत.

याआधीही बाजारात महिलांच्या हाणामारीचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अनेकवेळा रस्त्यावरून भाजी खरेदी करतानाही महिला एकमेकींशी भांडताना दिसतात. ज्याचे व्हिडीओनंतर सोशल मीडियावर व्हायरल होतात.

हे पण वाचा


टीम झुंजार