Viral Video: पावसाळ्यात तरुण-तरुणी भिजण्यासाठी आणि मजामस्ती करत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी धबधबे, धरण, नदीवर पोहोचता. काहीजण समुद्र किनारी जातात, बोटींगचा आनंद घेतात. अशावेळी सांगूही पर्यटक एकत नाहीत.तरीही पर्यटक नसतं धाडस करतात, आणि हेच धाडस त्यांचा अंगाशी येतं. तलाव, धरणे, समुद्रकिनारी अनेक पर्यटक फिरायला जात असतात. तर अशा ठिकाणी फिरायला गेल्यानंतर विशेष काळजी घेणे गरजेचे असते. समुद्रकिनाऱ्यावर बोटिंग करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण सध्या एका थरारक घटनेचा व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये १० ते १२ पर्यटकांना घेऊन जाणारी बोट भंडारदरा डॅममध्ये बुडाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
२० सेकंदात १२ पर्यटकांना घेऊन जाणारी बोट बुडाली
व्हायरल होत असलेला व्हिडिओ भंडारदरा डॅममधला असल्याचं बोललं जात आहे. या घटनेमध्ये पर्यटकांसहित बोट बुडाल्याचं दिसत आहे. एका पर्यटकाने आपल्या मोबाईलमध्ये ही घटना कैद केली आहे. तर या दुर्घटनेत बोटही पाण्यात बुडाल्याचं दिसत आहे. दरम्यान, बोट निघाल्यानंतर सर्व पर्यटक खूश दिसत आहेत. तर एक पर्यटक मोबाईलमध्ये शूट करताना दिसत आहे. या सगळ्याचा आनंद घेण्यात व्यस्थ दिसत आहेत. मात्र त्यांचा हाच आनंद जास्त काळ टिकू शकला नाही. पुढच्याच क्षणी संपूर्ण पाणी बोटीत जाऊन बोट उलटी होते. सर्व पर्यटकही बोटीसोबत बुडू लागतात. यामध्ये पर्यटकांच्या किंचाळण्याचा आवाज येत आहे.
काळजाचा ठोका चुकवणारी घटना कॅमेऱ्यात कैद..
बोट निघाल्यापासून ही घटना फक्त २० सेकंदात घडली आहे. तर ही थरारक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. राहुल बोरोले नावाच्या एका युवकानं हा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. राहुल आणि त्यांच्या जोडीदारांनी यावेळी या सर्व प्रवाशांना वेळीच मदत करुन सुखरुप बाहेर काढलं. मात्र अशाप्रकारे पर्यटकांनी पोहता येत नसेल तर आपला जीव धोक्यात घालू नये असं आवाहन करण्यात आलं आहे.
पाहा व्हिडीओ
ही घटना ५ दिवसांपूर्वी घडली आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशा प्रकारे पाण्याशी खेळणं, रिस्क घेणं किती महागात पडू शकते हे हा व्हिडीओ पाहून लक्षात येत आहे.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






