जिल्हातील अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ व त्यांना जलदगतीने न्याय मिळावा म्हणून उत्राण येथे भव्य मोर्चा.

Spread the love

एरंडोल :- तालुक्यातील उत्राण येथे आज भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे घडलेल्या चिमुकली कल्याणीताई व पारोळा तालुक्यातील धूळपिंप्री येथील घडलेल्या आदिवासी तरुणी वर एरंडोल तालुक्यातील खडके बू.येथील घडलेल्या आश्रम शाळेतील तरुणीवर ज्या नराधमाने अत्याचार केला. ,त्यांच्या विरोधात, निषेधार्थ आज उत्राण गुजर हद्द व अहिर हद्द गावातून मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या वेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उर्दू जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,

एस बी संघवी इंग्लिश स्कूल,जे एस जाजू हायस्कूल,उर्दू हायस्कूल, शाळेतील विद्यार्थी, निलॉन्स आचार कंपनीचे कर्मचारी, व गावातील व्यवसायिक बांधवानी आपली दुकाने बंद ठेवून मुक मोर्चा मध्ये ग्रामस्थांनी सुद्धा हजारोच्या संख्येने हजर राहून निषेध केला , जळगाव जिल्ह्याचे माजी पालक मंत्री डॉ सतीश आण्णा पाटील यांनी सांगितले की गावात शाळेत सी सी टीव्ही कॅमेरा बसवणे गरजेचे आहे व मुख्यमंत्री साहेबांनी सरकारी वकील उज्वल निकम यांची नेमणूक करून केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी अशी मागणी केली,

माजी पंचायत समिती सभापती अनिल महाजन,माजी पंचायत समिती सदस्य भागवत पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आनंदा धनगर ,हरून देशमुख,जितेंद्र चौधरी, पत्रकार हरेश पांडे ,प्रकाश कुवर,प्रिन्स देशमुख,ज्ञानेश्वर महाजन्,जयनूल शेख,शाळेंचे मुख्याध्यापक यांनी मनोगत व्यक्त करतांना शासनाने आरोपींना फाशी द्यावी अशी भावना व्यक्त केल्या ग्राम पंचायत उत्राण गु ह चे सरपंच मनीषा वाघ ,उपसरपंच वाल्मिक ठाकरे, उत्राण अह चे प्रभारी सरपंच मंगलबाई कोळी,सरपंच शारदा पाटील

व सर्व ग्राम पंचायत सदस्य ,पोलीस पाटील प्रदीप तिवारी,राजेंद्र महाजन, यांनी मोर्चेत् सहभाग घेऊन जाहीर निषेध केला, आरोपींना फाशी मिळावी म्हणून कासोदा पोलीस स्टेशन चे सहाय्य्क पोलीस निरीक्षक श्री गुंजाळ साहेब यांना संपूर्ण ग्रामस्थ सोबत ग्राम पंचायत सरपंच उपसरपंच यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले

पहा मुक मोर्चा व्हिडिओ

टीम झुंजार