“तू मला आनंदी ठेवत नाहीस”पतीस व्हॉट्सअँप कॉलवर सांगून दोन मुलांची आई प्रियकरासोबत विदेशात गेली पळून.पतीला पाठवले फोटो.

Spread the love

डुंगरपूर (राजस्थान):- जिल्ह्यातील दीपिका तिच्या मुलांना टाकून प्रियकरासोबत परदेशात पळून गेली आहे. यामुळे सध्या तिची चर्चा सुरू आहे. या प्रकरणी तिच्या पतीने पोलीस तक्रार दाखल केली आहे.पोलीस सध्या तिचा तपास करत आहेत.

पोलिसांकडून तपास सुरू आहे. मात्र दीपिकाचा शोध लागलेला नाही. दीपिका दुसऱ्या समुदायातील तरुणासोबत निघून गेली. घरी काहीच न सांगता दीपिका परदेशात गेली. दीपिकाला दोन मुलं आहेत. मुलगी ११ वर्षांची, तर मुलगा ७ वर्षांचा आहे. यामुळे सीमा हैदर प्रकरणासारखीच ही घटना घडली आहे.

पत्नी अचानक बेपत्ता झाल्याने पतीने चितरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र अजूनही तिचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाला घेराव घालत घोषणाबाजी केली. यामुळे तिचा तपास लागणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पतीच्या अनुपस्थितीत ती वैद्यकीय उपचारांसाठी गुजरातला जायची. १० जुलैला ती गुजरातला गेली. पण १३ जुलैपर्यंत ती परतलीच नाही. तिने पतीला व्हॉट्सअँप कॉल केला. ‘तू मला आनंदी ठेवत नाहीस. त्यामुळे दूर जात आहे, असे तिने म्हटले. त्यामुळे पतीच्या पायाखालची जमीन सरकली.

पती घरी आला तेव्हा पत्नी घरात नव्हती. ती लाखोंचे दागिने आणि रोकड गायब होती. त्यानंतर पतीने बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. दीपिकाचे काही फोटो समोर आले आहेत. त्यात ती एका तरुणासोबत बुरख्यात दिसत आहे. दुसऱ्या फोटोत तिने साडी परिधान केली आहे. दीपिका कुवेतला गेली असल्याचा अंदाज आहे. यामुळे पोलीस सध्या तसा तपास करत आहेत. सध्या अशा प्रकारच्या अनेक घटना समोर येत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार