अडावद येथे 11 तलवारी, 2 धारदार गुप्त्या या हत्यारांसह १३ हजारांचा मुद्देमालासह 5 संशयितांना अटक

Spread the love

अडावद :- येथील पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर तब्बल ११ तलवारी व दोन धारदार गुप्त्या संशयितांकडून जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिस संशयितांची कसून चौकशी करीत आहेत. अडावद पोलिस ठाण्याला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर संशयित सागर भगवान महाजन (वय २२, रा.अडावद), राहुल लक्ष्मण ठाकरे (१९, रा.सुटकार), राज प्रमोद ठाकूर (२१, रा. लोणी, ता. चोपडा), चिरंजीव रवींद्र भोई (१९, रा.अडावद), मयूर रामेश्वर कोळी (२०, रा.अडावद) यांच्याकडून एकूण ११ धारदार तलवारी व २ धारदार गुप्त्या अशी एकूण १३ हत्यारांसह १३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी रविवारी (ता. १३) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, सहायक पोलिस अधीक्षक ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली अडावद पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक निरीक्षक गणेश बुवा, उपनिरीक्षक जगदीश कोळंबे, उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील, सहायक फौजदार शरीफ शेख, मुकेश तडवी, ज्ञानेश्वर सपकाळे, सुनील तायडे, नासिर तडवी, विनोद धनगर, फिरोज तडवी, किरण शिरसाठ, सतीश भोई, प्रदीप पाटील, शुभम बाविस्कर, संदीप पाटील, शैलेश माळी, रमिज सय्यद यांनी केली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार