अमळनेर:- तालुक्यातील निम येथील ३३ वर्षीय विवाहित तरूणाचा शेतात झोपेतच मृत्यू झाला असून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निम येथील वासुदेव रामसिंग पाटील उर्फ लोटण (वय ३३) हा आई वडिलांसह कळमसरे रस्त्यावरील शेतात निंदणीसाठी गेला होता.
दुपारी त्याचे आईवडील घरी आले मात्र तो निंदनी कामासाठी शेतातच थांबून होता. साडेचार वाजले तरी वासुदेव परत आला नाही म्हणून त्याची आई त्याला पाहण्यासाठी गेली असता तो शेतातील झाडाखाली झोपलेला आढळून आला. त्याला उठवले असता तो उठत नसल्याने त्याला आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलवून त्यास गाडीत टाकून अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता
डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी व पाच वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. रणछोड पाटील यांच्या खबरिवरून मारवड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो ना मुकेश साळुंखे करीत आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






