शोकाकुल वातावरणात तिघा युवकांवर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार, एरंडोल शहर स्वयंस्फुर्तीने बंद.

Spread the love

मृतांच्या वारसास पाच लाखांची शासकीय मदत आ.चिमणराव पाटील

एरंडोल l प्रतिनिधी

एरंडोल :-रामेश्वर येथे नदीच्या पात्रात बुडून मरण पावलेल्या तीनही युवकांवर दुपारी दोन वाजेच्या सुमारास हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.युवकांचे नातेवाईक, मित्र यांचा आक्रोश मन हेलावणारा होता.आमदार चिमणराव पाटीलवयांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची शासकीय मदत देण्यात येणार असल्याची माहिती आमदार चिमणराव पाटील यांनी दिली.

शहरातील व्यावसायिकांनी स्वयंस्फुर्तीने व्यवसाय बंद ठेवून मृतांना श्रद्धांजली वाहिली.शहरातून काल सकाळी श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्यामुळे सुमारे दोनशे युवकांनी रामेश्वर येथे पायी कावडयात्रा काढली होती.रामेश्वर येथे कावडयात्रा पोहोचल्यानंतर युवकांनी नदीच्या पात्रात आंघोळ केली.यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अक्षय उर्फ भैय्या प्रवीण शिंपी,सागर अनिल शिंपी,पियुष रवींद्र शिंपी या एकात कुटुंबातील तीन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.तीनही युवकांचे मृतदेह आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास तीन रुग्णवाहिकांमधून त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले.तिघाही युवकांचे मृतदेह निवासस्थानी पोहोचताच त्यांचे नातेवाईक व मित्र परिवार यांनी आक्रोश केला.

दुपारी एक वाजता तिघाही युवकांची एकाचवेळी अंत्ययात्रा काढण्यात आली.दुपारी दोन वाजेच्या सुमारास कासोदा रस्त्यावरील स्मशानभूमीत तिघाही युवकांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित हजारो नागरिक भावनाविवश झाले होते.मृत युवकांचे ८५ व ७८ वर्षीय बबन शिंपी व वासुदेव शिंपी या दोन्ही आजोबांचा आक्रोश मन हेलावणारा होता.७८ वर्षीय बबन शिंपी यांचे दोन नातू तर ८० वर्षीय वासुदेव शिंपी यांचा एक नातू यांचा नदीत बुडून मृत्यू झाला.एकाच कुटुंबातील तीन युवकांचा मृत्यू झाल्यामुळे शहरावर शोककळा पसरली होती.

सकाळपासूनच तिघाही युवकांच्या निवासस्थानाजवळ नागरिकांनी गर्दी केली होती.कावडयात्रेत सहभागी झालेले युवक देखील यावेळी भावनाविवश झाले होते.युवकांचे आई,वडील,भावंड, आजोबा व नातेवाईक यांच्या आक्रोशामुळे उपस्थितांच्या डोळ्यात देखील अश्रू जमा झाले होते.यावेळी उपस्थित पदाधिकारी, समाजबांधव त्यांचे सांत्वन करून धीर देण्याचा प्रयत्न करीत होते.आमदार चिमणराव पाटील यांनी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेशीसंपर्क साधून घटनेची माहिती दिली.शासनाच्यावतीने तिघाही युवकांच्या
वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची शासकीय देण्यात येणार असल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी यावेळी सांगितले.

सकाळी तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी मृतांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या परिवाराची भेट घेवून सांत्वन केले.तसेच विविध राजकीय पक्षाच्या पदाधिका-यांनी परिवाराची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले.अंत्ययात्रेत आमदार चिमणराव पाटील,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.हर्शल माने,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, दशरथ महाजन,रवींद्र महाजन,जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले,कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी विजय महाजन,माजी सदस्य नाना महाजन,माजी नगरसेवक प्रा.मनोजवपाटील,शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवींद्र जाधव,विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदाम राक्षे,

युवासेनेचे जिल्हा समन्वयक अतुल महाजन,शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख कुणाल महाजन,विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आर.डी.पाटील,भाजपचे शहराध्यक्ष निलेश परदेशी, anglo उर्दू हायस्कूलचे अध्यक्ष जहिरोद्दिन शेख कासम,माजी नगरसेवक जगदीश ठाकूर यांचेसह राजकीय,सामाजिक,शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, अहिर क्षत्रिय शिंपी समाजाचे पदाधिकारी यांचेसह हजारो नागरिक सहभागी झाले होते.

दरम्यान आमदार चिमणराव पाटील यांनी घटनेची संपूर्ण माहिती मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना ब्रह्मण धन मिळवून दिली.मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी तात्काळ जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना आदेश करून एनडीआरएफ टीम च्या साह्याने तिसऱ्या युवकाचा शोध कार्यास सुरुवात करण्यात सुचना केल्या.उशिरा रात्री एक वाजेपर्यंत जिल्हाधिकारी रामेश्वर येथे तर ठोकून होते.रात्र असल्यामुळेतिसऱ्या युवकाचा मृतदेह सापडून आला नाही म्हणून सकाळी सहा वाजेपासून परतसुरुवात करण्यात आली.सकाळी सात वाजता स्थानिक नागरिकांना तिसऱ्या युवकाचा मृतदेह सापडून आला.

टीम झुंजार