Video Viral:दैव बलवत्तर! एक कार भरधाव वेगात आली,अन् सिग्नल वरून सुटलेल्या वाहनांमधून रस्त्याच्या पलीकडे गेली. पुढे…… पहा व्हिडिओ

Spread the love

Video Viral :सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर काही व्हिडिओ पाहून आपणही थक्क होऊन जातो. काही घटना आपल्याला विचार करायला भाग पाडतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
त्यामध्ये एक कार भरधाव वेगात वाहनांमधून रस्त्याच्या पलीकडे जाताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका रस्त्यावरील चौकातील आहे. काही वाहने सिग्नलला उभे राहिले आहेत तर काही वाहने सिग्नल सुटल्यानंतर पुढे जात असताना दिसत आहेत. तेवढ्यात एक कार भरधाव वेगाने वाहनांच्या मध्ये घुसते. वाहनांच्या गर्दीमधून ती पुढे जाते पण सुदैवाने या कारने एकाही वाहनाला धडक दिली नाही. त्यामुळे मोठा अपघात टळला आहे.

दरम्यान, या कारचा वेग एवढा होता की दुसऱ्या गाडीला चुकून धडक बसली असती तर त्या गाडीचा चुराडा झाला असता. पण सुदैवाने काहीच न झाल्यामुळे या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीसुद्धा मजेशीर कमेंट केल्या आहेत. “यमदेव रविवारच्या सुट्टीवर असले की जगण्याच्या अशा ऑफर मिळत असतात” अशा विनोदी कमेंट नेटकऱ्यांनी केल्या असून अनेकांनी हा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर केला आहे.

हे पण वाचा


टीम झुंजार