रस्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची मंगळपोत लांबवली. एरंडोल येथील पहाटे 6 वाजेची घटना.

Spread the love

एरंडोल :-सकाळी फिरायला गेलेल्या ६९ वर्षीय वृद्धेस धरणगाव रस्ता कोठे आहे असे विचारून मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी वृद्धेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळपोत ओढून नेल्याची घटना आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शासकीय विश्रामगृहासमोरील रस्त्यावर घडली.मंगळसूत्र ओढून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यांचा मोबाईल घटनास्थळीच पडला असून पोलीस मोबाईलच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेत आहेत.

याबाबत माहिती अशी,की परदेशी गल्लीमधील रहिवासी श्रीमती विमलबाई लक्ष्मण चौधरी (वय-६९) ह्या नेहमीप्रमाणे सकाळी शासकीय विश्रामगृहासमोरील
रस्त्यावर फिरायला गेल्या होत्या. विमलबाई चौधरी ह्या विश्रामगृहाच्या पुढे चालत असतांना मोटार सायकलवरून तीन युवक आले आणि त्यांच्या जवळ थांबून धरणगाव रस्ता कोठे आहे असे विचारले.विमलबाई चौधरी यांनी धरणगाव रस्ता मागे राहिला असल्याचे सांगितले असता त्यांनी पुढे रस्ता आहे का असे विचारून चौकशी केली.

त्यानंतर आजी मला लघुशंका करायची आहे असे तुम्ही पुढे जा असे एका युवकाने त्यांना सांगितले.विमलबाई चौधरी पुढे चालत असतांना मोटार सायकलवरील दोन जन पुढे निघून गेले व मागे असलेल्या युवकाने विमलबाई चौधरी यांच्या गळ्यातील ३५ gram वजनाची सोन्याची मंगलपोत ओढण्याचा प्रयत्न केला. विमलबाई चौधरी यांनी त्यास प्रतिकार केला असता त्यांना खाली पाडून मंगलपोत ओढली आणि जवळच असलेल्या मक्याच्या शेतातून पळ काढला. मोटारसायकलवरील दोन युवक पुढे उभे होते त्यावेळी विमलबाई चौधरी यांनी आरडाओरड केली

त्याचवेळी दत्त मंदिराकडून येत असलेल्या करण दिलीप परदेशी या युवकाने मोटारसायकलवरील युवकांना पकडण्याचा प्रयत्न केला.मात्र झटापटीत मोटारसायकलवरील एका युवकाचा मोबाईल खाली पडला व ते पळून गेले. विमलबाई चौधरी यांनी चोरट्यांना प्रतिकार करून मंगलपोत घट्ट धरून ठेवल्यामुळे अर्धवट तुटलेली सुमारे सतरा gram वजनाची आणि ७२ हजार रुपये
किमतीची सोन्याची पोत चोरट्यांनी लांबवली तर उर्वरित पोत विमलबाई चौधरी यांच्या साडीत अडकली असल्यामुळे सुरक्षित राहिली.याबाबत विमलबाई चौधरी
यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अज्ञात चोर्त्यांचा शोध घेत आहेत.

#हे पण वाचा

टीम झुंजार