अमळनेर पोलिसात विनयभंगासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल.
अमळनेर :- येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात पोट दुखत असल्याने एक महिला उपचारासाठी डॉक्टरांकडे गेली होती. मात्र उपचारासाठी आलेल्या या महिलेचा डॉक्टरने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरा डॉक्टर अनिल शिंदे यांच्याविरुद्ध विनयभंगासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित महिलेचं सातत्याने पोट दुखत असल्याने महिलेनं धुळे येथील एका रुग्णालयात तपासणी केली. यावेळी अपेंडिक्स असल्याचं निदान करण्यात आलं. त्यामुळे याबाबत उपचारासाठी महिला अमळनेर येथील डॉ. अनिल शिंदे यांच्या नर्मदा हॉस्पिटलमध्ये गेली होती.
पीडित महिला तपासणी करण्यासाठी आली असता तपासणी करण्याच्या बहाण्याने डॉक्टर अनिल शिंदे यांनी विनयभंग केला, असा आरोप पीडित महिलेनं केला आहे.पोलीस तक्रारीत महिलेनं आपला विनयभंग झाला असल्याचं सांगितलं आहे. महिलेच्या तक्रारीवरून अमळनेर पोलिसात रात्री उशिराने डॉक्टर अमोल शिंदेंच्या विरोधात विनयभंगासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. या घटनेमुळे जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
हे पण वाचा
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






