अमळनेर येथे ३७ वर्षीय अविवाहित तरुणाने गळफास घेवून जीवनयात्रा संपवली

Spread the love

अमळनेर : कुंटे रोडवरील प्रदीप चिंधु पाटील वय ३७ याने दुकानाच्या छताच्या लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेतल्याची घटना २५ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.
प्रदीप हा अविवाहित होता. भाजीपाला विक्री व्यवसाय करायचा व सात ते आठ दिवसांनी अंघोळ करायला घरी येत होता.

२५ रोजी छतावर दुर्गंधी येत असल्याने तेथे जाऊन पाहिले असता प्रदीप ने गळफास घेऊन आत्महत्या करून तीन चार दिवस झाले असावेत अशी परिस्थिती दिसून आली. प्रदीप चा मोठा भाऊ प्रकाश याने खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार