मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील सांताक्रूझ परिसरात असलेल्या गॅलेक्सी हॉटेलला लागलेल्या आगीत आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५ जण जखमी झाले आहेत. मुंबई पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आहे. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी हजर असून संपूर्ण हॉटेल रिकामे करण्यात येत आहे.
हॉटेलला लागलेल्या आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. शॉर्ट सर्किट हे कारण असू शकते असे सांगितले जात आहे, परंतु अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. आगीची माहिती हॉटेलमधील लोकांना मिळताच चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. लोक इकडे तिकडे वेगाने धावू लागले. अलार्म वाजवून हॉटेल तातडीने रिकामे करण्यात आले.
हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर दुपारी एकच्या सुमारास आग लागली. अग्निशमन अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, हॉटेलमधून आठ जणांची सुटका करून त्यांना कूपर रुग्णालयात नेण्यात आले.
आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि पाण्याचे अनेक टँकर हॉटेलकडे रवाना करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






