नवायुवकांनी सुरू केलेला उपक्रम अतिशय स्तुत्य . – भाऊसाहेब पाटील
धरणगाव :- जि प शाळा दहिदुले येथील गरजू विद्यार्थ्यांना दि 26/08/2023 वार शनिवार रोजी नवयुवक मित्र मंडळ पिंप्री यांच्याकडून शालेय साहित्य वाटप करण्यात आले त्याप्रसंगी नवयुवक मित्र मंडळ पिंप्री सदस्य निधी इन्फोटेक चे संचालक श्री समाधान पाटील, ड्रीम मोबाईल चे संचालक श्री गौतम डोळे, पिंप्री येथील आदर्श प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री सतीश शिंदे सर यांनी उपस्थिती देऊन शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले .
सदर कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री भाऊसाहेब पाटील व सदस्य बाबूलाल पिंजारी, पोलीस पाटील श्री गुलाब सोनवणे, श्री सुरेश सोनवणे, श्री एकनाथ गायकवाड, श्री दगडू पाटील श्री गणेश सपकाळे आदी पालक उपस्थित होते तसेच कार्यक्रम प्रसंगी श्री भाऊसाहेब पाटील व पोलीस पाटील श्री गुलाब कोळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री नंदलाल मराठे यांनी मेहनत घेतली तसेच शाळेतील शिक्षक श्री उगलाल शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
भाऊसाहेब पाटील व गुलाब सोनवणे यांनी आपल्या मनोगतात नावायुवकांनी केले कार्य कौतुकास्पद असून आम्ही देखील आपल्या कार्यात सहभागी होण्याचा मानस व्यक्त करत . नवोपक्रमला दाद दिली .
शाळेतील मुलांना साहित्य वाटप केल्यामुळे गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






