भीषण अपघात! भारतातील अब्जाधीश आणि कुबेर ग्रुप चे मालक विकास मालू यांची १२ कोटींची रोल्स रॉयस १२ सेकंदात स्वाहा

Spread the love


दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर २२ ऑगस्ट रोजी झालेल्या रोल्स रॉयस व इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरच्या अपघाताच्या चौकशीसाठी हरियाणा पोलिसांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापन केली आहे.
अलिशान कार रोल्स रॉयसने इंधन टँकरला धडकल्यानंतर आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता तर चार जण जखमी झाले होते.

१२ कोटींच्या रोल्स रॉयस कारचा अपघात झाला. या अपघातात भारतातील अब्जाधीश आणि कुबेर ग्रुप चे मालक कास मालू गंभीररित्या जखमी झाले आहे. त्यांच्याबरोबरच अन्य दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून यामध्ये विकास मालू यांच्या रोल्स रॉयस कारचीगती २३० किमी प्रति तास असल्याचे समोर आले आहे. विकास मालू यांच्याकडे रोल्स रॉयसची एकूण ६ कार आहेत. मालू दुबईमध्ये राहतात. दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा मृत्यू झाल्यानंतर मालू यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आले होते.

विकास मालूयांच्या वकीलांने सांगितले की, रोल्स रॉयस कार तसबीर नावाचा ड्रायवर चालवत होता. विकास कार चालवत नव्हते. कारमध्ये विकास मालू, एक महिलाआणि चालक होते. विकास मालू सकाळी १० वाजता घरातून निघाले होते व ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या भीषण अपघाताचे फोटो समोर आले आहेत. एक कार आणि ऑइल टँकरमध्ये जोरदार धडक झाली. मात्र या धडकेत टँकरमधील २ लोकांचा मृत्यू झाला तर कारमधील तीनजण जखमी झाले.

हा अपघात दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे वर नूंह जवळ झाला होता. कार दिल्लीहून जयपूरकडे जात होती. सांगितले जात आहे की, कारची गती २३० किलोमीटरच्या जवळपास होती. अपघातानंतर टँकरही अनियंत्रित होऊन रस्त्याकडेला पलटी झाला. दोन्ही गाड्यांचा चुराडा झाला. मात्र कारमधील तीन जण सुदैवाने वाचले आहेत. त्यांच्यावर सध्या गुरुगाममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रोल्स रॉयस कारमध्ये कुबेर गुपचे मालक विकास मालू,दिव्या आणि तसबीर होते. ते जखमी झाले आहेत. तर टँकरमधील रामपीत आणि कुलदीप कुमार यांच्या या अपघातात मृत्यू झाला आहे. टँकरमधील अन्य एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार