पिडीतेची प्रकृती बिघडल्याने खाजगी रुग्णालयात भरती करून प्रियकर झाला फरार.
जालना : शहरातील एका कॅफे शॉपमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेयसीवर नराधम प्रियकराने दोन वेळा अत्याचार केला. यात प्रेयसी गर्भवती राहिली. हा प्रकार समोर येऊ नये संकरित परस्पर गोळ्या-औषधी देऊन गर्भपात केला.परंतु तरुणीची प्रकृती बिघडल्याने प्रेयसीला रुग्णालयातच सोडून प्रियकर फरार झाला आहे.
पोलिसांनी दोनच दिवसांपूर्वी धाड टाकलेल्या जालना शहरातील कॉफी शॉपमधील आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत एका १८ वर्षीय तरुणीवर दोन वेळा प्रियकराकडून बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील आरोपी प्रियकराने प्रेयसी गर्भवती राहिल्यानं तिला परस्पर गर्भपाताच्या गोळ्या-औषधी दिल्या. पण तिची तब्बेत बिघडल्यानं प्रियकराने तिला एका खाजगी रुग्णालयात भरती करून प्रियकर फरार झाला आहे.
तरुणीने दिली पोलिसात तक्रार…
तब्बेतीत सुधारणा झाल्यानंतर पीडित मुलीने पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून प्रियकराविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी प्रियकर फरार झाला आहे. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी दोन पथके रवाना केली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






