एरंडोल पोलीस पथकाची कौतुकास्पद कामगिरी
प्रतिनिधी | एरंडोल
एरंडोल : सकाळी फिरायला जात असलेल्या 68 वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची मंगल पोत ओढून पळणाऱ्या दोन आरोपींना एरंडोल पोलीस पथकाने चाळीसगाव येथून सिनेस्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतले. पोलिसांनी गळ्यातील वृद्धेच्या गळ्यातील अर्धवट तुटलेली 18 ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत जप्त केली असून त्याचा एक साथीदार अद्याप फरार आहे.
याबाबत माहिती अशी की परदेशी गल्लीतील वृद्ध महिला विमलबाई लक्ष्मण चौधरी ह्या 24 ऑगस्ट रोजी विश्रामगृहासमोरील रस्त्यावर फिरायला जात होत्या.
त्यावेळी मोटर सायकल वरून आलेल्या तीन अज्ञात आरोपींनी वृद्ध महिलेस धरणगाव रस्ता कोठे आहे अशी विचारणा करून त्यांच्या गळ्यातील 35 ग्रॅम वजनाची सोन्याची मंगल पोत लांबवण्याच्या प्रयत्न केला. विमलबाई चौधरी यांनी विरोध करताच आरोपींनी मंगल पोत तोडून पलायन केले होते. त्यावेळी आरोपीचा मोबाईल खाली पडल्यामुळे पोलिसांनी मोबाईलच्या माध्यमातून तपास सुरू केला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी चाळीसगाव येथील मुसा कादरी बाबा दर्गा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलीस निरीक्षक सतीश बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे, उपनिरीक्षक शरद बागल, हवालदार अनिल पाटील मिलिंद कुमावत अकील मुजावर यांनी चाळीसगाव येथे सापळा रचला. आरोपी यांना पोलिसांचा संशय आल्याने त्यांनी पळून जाण्याच्या प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे सय्यद तोसीब सय्यद अली राहणार पिंप्राळा हुडको जळगाव व आकाश राजू खरे राहणार दूध फेडरेशन जवळ जळगाव असल्याचे सांगितले पोलिसांनी आरोपीकडून 17 ग्रॅम अर्जावट तुटलेली सोन्याची मंगल पोत जप्त केली आहे.
पोलीस पथकाने केलेल्या कारवाईबाबत नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






