अमळनेर l प्रतिनिधी :- गेल्या महिनाभरापासून अमळनेर तालुक्यात पाऊस पडलेला नाही म्हणून अमळनेर तालुका दुष्काळी जाहीर करून शासनाने जनावरांना चारा आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा करावी अशी मागणी अमळनेर तालुका शिवसेना (उबाठा) तर्फे करण्यात आली आहे. महिनाभर पाऊस खंडित झाल्याने पिकांचे हाल झाले आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न हातचे गेले आहे. शेतकऱ्यांना पीक विमा किंवा नुकसानापोटी अनुदान देण्यात यावे.
तसेच तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. भविष्यात जनावरांना चारा आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई भासेल म्हणून शासनाने तात्काळ पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी तालुका प्रमुख श्रीकांत पाटील , उपजिल्हाप्रमुख कल्याण पाटील ,शहरप्रमुख सुरज परदेशी , विजय पाटील ,प्रताप शिंपी , रवींद्र पाटील , नितीन निळे ,राजेंद्र पाटील , रणजित पाटील ,साहेबराव पवार यांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






