जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आजचा दिवस आपणास लाभदायी आहे. व्यापार – व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल. दिवसभर आनंदी व खेळीमेळीचे वातावरण राहील. गृहसजावटीत काही नावीन्य आणाल. घर सुशोभित करण्यासाठी व्यवस्था बदलाल. वाहनसौख्य मिळेल. सामाजिक कार्यासाठी प्रवास होतील. रमणीय स्थळाच्या प्रवासाचा आनंद उपभोगू शकाल.
वृषभ :-
आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आज आपण व्यापार वृद्धीवर आपले लक्ष केंद्रित कराल. नवीन योजना व प्रणालीच्या वापराने व्यापार प्रगतीच्या दिशेने वाढत जाईल. मात्र कामात यश मिळण्यास विलंब होईल. दुपार नंतर व्यापारातील परिस्थिती अनुकूल होईल. कामा निमित्त प्रवास करावा लागण्याची सुद्धा शक्यता आहे. पदोन्नती होईल. आपल्या कामाच्या पद्धतीमुळे वरिष्ठ आपणावर खुश होतील. वडील व वडीलधार्यांकडून लाभ संभवतात.
मिथुन :-
आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आज आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. मनातून नकारात्मक विचार काढून टाकल्याने नैराश्यातून बाहेर पडू शकाल. अवैध कामे करून अडचणीत सापडण्याचा शक्यतेमुळे त्यापासून दूर राहणे हितावह होईल. अचानकपणे प्रवास करावा लागेल. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. नैराश्य दूर होऊ शकेल. लेखन वा साहित्यीक प्रवृत्ती मध्ये रस घ्याल. व्यापारात विकासाच्या दृष्टीने नव्या योजना अंमलात आणू शकाल. वरिष्ठांशी वाद संभवतात.
कर्क :-
आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आज आपण एखाद्याशी भावनात्मक नात्याने जोडले जाल. आनंद व मनोरंजनात्मक प्रवृत्तीमुळे मन प्रफुल्लित राहील. त्यात मित्रांचे सहकार्य मिळाल्याने मनोरंजनाचा आनंद द्विगुणित होईल. दुपार नंतर तब्बेत बिघडू शकते. वाहन जपून चालवा व रागावर नियंत्रण ठेवा. शब्द जपून वापरा. नवीन कार्य सुरू करायला आजचा दिवस प्रतिकूल आहे.
सिंह :-
आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आजचा दिवस व्यापार विस्ताराच्या दृष्टीने आर्थिक नियोजन करण्यास अनुकूल आहे. व्यावसायिकांना त्यांच्या हाताखाली असणार्या लोकांकडून व्यावसायिक लाभ होतील. धनप्राप्ती संभवते. व्याज, दलाली इत्यादी मार्गांनी प्राप्तीत वाढ होऊन आर्थिक विवंचना दूर होईल. चांगले कपडे, स्वादिष्ट भोजन ह्यामुळे मन प्रफुल्लित होईल. एखादा प्रवास संभवतो.
कन्या :-
आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. वस्त्र व अलंकारांची खरेदी आनंददायी राहील. कलेत विशेष आवड निर्माण होईल. व्यापारातील विकासामुळे मनास आनंद होईल. आजचा दिवस व्यवसायासाठी अनुकूल आहे. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.
तूळ :-
आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा भावात असणार आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. स्थावर संपत्ती विषयक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आईच्या तब्बेतीची काळजी राहील. कुटुंबात वाद संभवतात. दुपार नंतर स्वास्थ्य लाभेल. सृजनशील गोष्टींकडे लक्ष द्याल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस अनुकूल आहे.
वृश्चिक :-
आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. आजचा दिवस व्यावसायिकांना अनुकूल आहे. वैवाहिक जीवनात निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण होईल. स्थावर संपत्ती संबंधित कामाचे सुद्धा निराकरण होऊ शकेल. भावंडांशी जवळीक साधू शकाल. दुपार नंतर कामात प्रतिकूलता जाणवेल. शारीरिक व मानसिक व्यग्रता ह्यांचा अनुभव येईल. सामाजिक क्षेत्रात अपयश येईल. कुटुंबियांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. धनहानी संभवते.
धनू :-
आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आज संभाव्य मतभेद टाळण्यासाठी उक्ती व कृतीवर नियंत्रण ठेवावे लागेल. दिवसभर मनात गूढ व रहस्यमय विषयांचे विचार येतील. विद्यार्थ्यांना लेखन- वाचनात एकाग्रता ठेवावी लागेल. दुपार नंतर काळजी दूर होण्याचे उपाय मिळतील. मानसिक शांतता अनुभवाल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.
मकर :-
आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आज व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आज प्रत्येक कार्य विना विघ्न पार पडेल. दांपत्य जीवनातील वातावरणात कटुता निर्माण होईल. गूढ विषयांत गोडी निर्माण होईल. कार्यालयात आपला प्रभाव पडेल. दुपार नंतर मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव राहील. मनात निराशेचे ठग दाटतील. निर्णय शक्तीचा अभाव जाणवेल. घरातील कामासाठी पैसा खर्च होण्याची शक्यता. शेअर- बाजारात यशस्वीपणे गुंतवणूक करू शकाल.
कुंभ :-
आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आज आपल्यातील धार्मिक भावना उफाळून येईल. आज एखाद्या धार्मिक कार्यासाठी खर्च कराल. कोर्ट- कचेरीच्या कामात यश मिळेल. पुण्यकार्यासाठी पैसा खर्च होईल. मनःशांतीसाठी केलेल्या प्रयत्नांत यशप्राप्ती होईल. दुपार नंतर आपले प्रत्येक काम सहजपणे पार पडेल. दांपत्य जीवनात गोडवा राहील. शरीर स्वास्थ्य सुद्धा चांगले राहील.
मीन :-
आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आज शेअर- सट्टा ह्यातून काही आर्थिक लाभ होईल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल. व्यवसायात लाभ होईल. कुटुंबात सुख- शांती लाभेल. रमणीय ठिकाणी प्रवासाला जाल. मित्रां कडून लाभ होईल. दुपार नंतर काही कारणाने मानसिक चिंता राहील. धार्मिक कार्यावर अधिक खर्च होईल. प्राप्तीच्या प्रमाणात खर्चाचे प्रमाण जास्त राहील. घरातील वातावरण शांतिदायक राहील.
हेही वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






