नेवासा l प्रतिनिधी मागील वर्षेी अतिवृष्टीने नेवासा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्याचे कपाशी,तुर,बाजरी,मका,व फळ बाग या पिकांचे नुकसान झाले होते,सदर पिकांचे मागील वर्षी पंचनामे देखील करण्यात आले होते.अगोदरच पाऊस पडत नसल्याने खचून गेलेला बळीराजा पिकाप्रमाणे अर्धमेला झाला आहे.त्यात उशीरा का होईना बळीराज्याच्या आर्त हाकेला प्रतिसाद देत परिसरातील शेतकरी वर्गावर शासनाची कृपा झाली आणि मागील वर्षी अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडलेल्या पिकाची भरपाई मंजूर होऊन ही यादी मध्ये नावे येऊन ही नुकसान भरपाई आली नसून शेतकरी वर्गात नाराजी आहे.
नुकसान भरपाई आली नसून त्वरित नुकसान भरपाई जमा करावी अन्यथा नाविलाजास्तव प्रशासनाच्या विरोधात जीवन ज्योत फाऊंडेशन च्या वतीने दि.07/09/2023 रोजी ठिक सकाळी तहसीलदार कार्यालय समोर अर्धनग्न अवस्थेत बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल.असे निवेदन तहसील यांना देण्यात आले या वेळी कमलेश नवले,अक्षय बोधक,हेमंत चामुटे,राहुल कागुणे,नरेंद्र नवथर,जैद शेख,आप्पासाहेब आरगडे,प्रदीप आरगडे,स्वप्निल गरड,मनोज आरगडे,अभिजीत बोधक,तोफीक शेख, अनेक शेतकरी उपस्थित होते.


हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






