Viral Video:आपल्यापैकी अनेकजणांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतले असेल. तर काहीजण खासगी शाळेत शिकलेले असतील. शाळेत असतानाचे ते दिवस आता फक्त आठवणीच राहिल्या आहेत. सध्या एका सरकारी शाळेतील शिक्षकाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
ते शाळेतील विद्यार्थ्यांना डान्स शिकवत आहेत. त्यांची पद्धत पाहून तुम्हीही थक्क व्हाल. व्हायरल होत असलेला व्हिडिओ उत्तरप्रदेशमधील रायबरेली येथील असून तेथील एका सरकारी शाळेतील शिक्षक भन्नाट डान्स आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत आहे. तर त्याचं पाहून विद्यार्थीही डान्स करत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच शेअर केला जात असून नेटकऱ्यांकडूनही या व्हिडिओला पसंती मिळत आहे.
दरम्यान, शिक्षक असावा तर असा, लहान पणी शाळेत असताना प्रत्येकाच्या आवडीचा एक तरी शिक्षक असतो. असे डान्स करणारे शिक्षक प्रत्येकाच्या आवडीचे असतात अशा भन्नाट कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आत्तापर्यंत ६३ हजार लोकांनी पसंती दर्शवली आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






