अमळनेर l प्रतिनिधी
बालगंधर्व रंगमंदिर पुणे या ठिकाणी बाबासाहेब पुरंदरे व छत्रपती शिवाजी महाराज यांचे एकत्रित शिल्प तयार करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा जाणून बुजून काही समाजकंटक प्रयत्न करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता असून आमचे आराध्य दैवत ही आहेत. तसेच सर्व महापुरुषांचे व महाराष्ट्रातील जनतेचे ते आदर्श आहेत. महापुरुषांचा योग्य तो सन्मान नेहमीच आपण करीत असतो.
आणि त्यांची बरोबरी कोणाही व्यक्ती बरोबर आपण करीत नाहीत तरी सुध्दा समाजामध्ये गैरसमज निर्माण व्हावा व दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण व्हावी आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून आपली स्वार्थाची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न काही ठराविक संघटना करीत असतात व नेहमीच समाजात अस्थिर वातावरण तयार करीत असतात.बाबासाहेब पुरंदरे ने सांगितलेला इतिहास आम्हाला कधीही मान्य नाही आणि त्यांच्या विचारांशी आमचा नेहमी वैचारिक विरोध राहिला आहे.हे शिल्प तयार करून ज्यांनी हे षडयंत्र तयार केले आहे.
त्यांच्या वरती व ज्यांनी हे बालगंधर्व रंगमंदिरात लावले त्या व्यक्तीवर तसेच ज्यांनी परवानगी दिली त्या व्यक्तीवर तेढ निर्माण करण्याचे खटले दाखल करत तात्काळ कार्यवाही करावी.तसेच ते शिल्प तिथून तात्काळ हटवत ह्या शिल्पावर कायम स्वरुपी बंदी आणण्याची मागणी आम्ही करीत आहोत. असे निवेदन मा.उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांना देण्यात आले. यावेळी संघर्ष मोर्चा च्या प्रतिभा ताई शिंदे, प्रा. अशोक पवार सर,गौतम मोरे,जयंतलाल वानखेडे, बापूराव ठाकरे, दिपक काटे,सुरेश कांबळे,हितेंद्र बडगुजर, नुरखान, कमलेश वानखेडे,विक्की जाधव आणि सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






