खळबळजनक!अरे बापरे; चोरट्यांनी चक्क 39 लाख रुपये रोकड रक्कम असलेले एटीएम मशीन पळवून नेले.

Spread the love

धाराशिव :- पैशासाठी चोरटे कोणत्या थराला जातील ह्याचा काही नेम नाही. धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कळंब शहरातील ढोकी रोडवरील जिजाऊ चौक परीसरातील एटीएम मशिनच चोरट्यांनी पळवून नेले आहे.या मशिनमध्ये 39 लाख रुपयांचा मुद्देमाल होता. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कळंब शहरात जिजाऊ चौक परिसरात बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. गर्दी आणि वर्दळीच्या ठिकाणी हे एटीएम असल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होते. बुधवारी ( ३०, ऑगस्ट) पहाटे भरचौकातील याच एटीएमवर चोरट्यांनी डल्ला मारला.

रोख रक्कमेसह हे एटीएम मशीन घेवुन हे चोरटे पसार झाले. सकाळी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. मशीमध्ये ३९ लाख इतकी रक्कम असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत तपास सुरू केला आहे.

घटनास्थळी पोलीस व गुन्हे तपासाचे श्वान पथक दाखल झाले आहे. एटीएमध्ये पैसे भरण्याचे काम एजन्सीकडे असते, त्यामुळे नक्की किती रक्कम असावी याबाबत निश्चित आकडा माहित नसल्याचे बॅंक व्यवस्थापकांनी सांगितले आहे. या चोरीची सध्या परिसरात चांगलीच चर्चा होत आहे.

टीम झुंजार