छत्रपती संभाजीनगर : रक्षाबंधनाच्या दिवशीच भावाने बहिणीच्या घरी आयुष्य संपवल्याचा खळबळजनक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला आहे. उद्योग नगरी वाळूज परिसरातील बजाजनगरातील छत्रपती नगरमध्ये बहिणीच्या घरी राहत असलेल्या 30 वर्षीय भावाने गळफास घेऊन आपले जीवन संपवलं आहे.ऐन रक्षाबंधनाच्याच दिवशी भावाने फाशी घेतल्याचे दिसताच बहिणीने एकच आक्रोश केला.
आकाश सर्जेराव शिंदे या 30 वर्षांच्या व्यक्तीने टोकाचा निर्णय घेतला. आकाश हा खैरका गाव, तालुका मुखेड जिल्हा नांदेडचा रहिवासी होता.ताई मला माफ करा, असे लिहून ठेवत त्याने जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह घाटी दवाखान्यात पाठवला. यानंतर डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. आकाशने रक्षाबंधनाच्या दिवशीच गळफास का घेतला, याचा तपास पोलीस करत आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






