ViralVideo:रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीवर कोसळला दुःखाचा डोंगर; मयत झालेल्या भावाच्या हातावर राखी बांधण्याचा हृदयद्रावक व्हिडिओ.

Spread the love

Viral video हैदराबाद : राखी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन, हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी बहिण आपल्या लाडक्या भाऊरायाला राखी बांधते. पण, तेलंगणा मध्ये रक्षाबंधनाचा दिवस एका बहिणीसाठी सर्वात वाईट दिवस ठरला.रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधण्यासाठी आलेल्या बहिणीवर दुःखाचा डोंगर कोसळला.

पोड्डापल्ली जिल्ह्यात एका व्यक्तीचा रक्षाबंधनाच्या दिवशीच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. यानंतर त्या व्यक्तीच्या बहिणीने रडत रडत आपल्या मृत भावाच्या हातात राखी बांधली. या घटनेचा हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चौधरी कनकैय्या असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला रडत रडत आपल्या मृत भावाला राखी बांधताना दिसत आहे. राखी बांधल्यानंतर ती साश्रू नयनाने आपल्या भावाला अखेरचा निरोप देते. व्हायरल व्हिडीओमध्ये कनकैय्या यांची पत्नी आणि कुटुंबातील इतर सहस्यही रडताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पानावतील. व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हे पण वाचा


टीम झुंजार