भंडारा :- नवऱ्याने बायकोची निर्घृण हत्या करुन नंतर स्वत: देखील आत्महत्या केलीची धक्कादायक घटना भंडाऱ्यामध्ये घडली आहे. भंडारा जिल्ह्यातील सेलोटी गावामध्ये ही घटना घडली आहे.या घटनेने भंडारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. भंडारा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण सेलोटी गाव साखर झोपेमध्ये असताना पहाटेच्या सुमारास नवरा-बायकोमध्ये जोरदार भांडण झाले. हा वाद ऐवढा विकोपाला गेला की संतप्त नवऱ्याने पत्नीच्या डोक्यामध्ये लाकडी पाट घातला.
या हल्ल्यात बायको गंभीर जखमी झाली. अतिरक्तस्राव झाल्यामुळे बायकोचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर नवऱ्याने देखील टोकाचे पाऊल उचलले.बायकोची हत्या केल्यानंतर नवऱ्याने देखील कालव्यामध्ये उडी मारून आत्महत्या केली. भारती भारत चाचेरे (४० वर्षे) अशी हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर भारत चाचेरे (४४ वर्षे) असं बायकोची हत्या करुन आत्महत्या करणाऱ्या नवऱ्याचे नाव आहे.
या घटनेमुळे भंडारा जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. पोलिसांनी दोघांचे देखील मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवले. भारती आणि तिचा नवरा भारत यांच्यामध्ये काहीना काही कारणावरुन नेहमीच वाद होत होते. बुधवारी हा वाद विकोपाला गेला आणि भारतने बायकोची हत्या केली. त्यानंतर आत्महत्या करून जीवन संपवले.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






