आजचे राशीभविष्य, ( शनिवार , ०२ सप्टेंबर २०२३ )

Spread the love

जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष :-

आज मीन राशीचा चंद्र आज आपल्या बारावा स्थानी असेल. आज आपला कल धार्मिकता व गूढ विद्या ह्याकडे होईल. द्विधा मनामुळे ठाम निर्णय आपण घेऊ शकणार नाही. शक्यतो आज आर्थिक देवाण – घेवाण करू नका. शारीरिक व मानसिक बेचैनी राहील. मंगल कार्यावर पैसा खर्च होईल. विदेशातील स्नेह्यांकडून बातम्या प्राप्त होतील.

वृषभ :-

आज च्या दिवशी मीन राशीचा चंद्र आज आपल्या लाभात स्थानी असेल. आज व्यापारात वृद्धी होण्या बरोबरच व्यापार विषयक सौदे लाभदायक ठरतील. उत्पन्नाच्या साधनांत वाढ होईल. वडीलधारी व मित्र ह्यांच्याकडून लाभ व सुखद क्षण लाभतील. दांपत्य जीवनात सुख समाधान मिळेल. पर्यटनाचे बेत आखाल. महिला वर्गाकडून लाभ होतील व मान – सन्मान मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील. संतती कडून आनंददायी बातम्या मिळतील.

मिथुन :-

आज च्या दिवशी मीन राशीचा चंद्र आज आपल्या दशमात स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल. नोकरी – व्यवसायात आपल्या श्रमाचे चीज होत आहे असे वाटेल. वरिष्ठ प्रोत्साहन देतील. त्यामुळे आपला उत्साह वाढेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. पित्या कडून लाभ होईल. सरकारी काम पूर्ण होण्यात अडचणी येणार नाहीत. दांपत्य जीवनात सुख, आनंद मिळेल.

कर्क :-

आज च्या दिवशी मीन राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्या बरोबरच भाग्योदयाची संधी आपली प्रसन्नता वाढवेल. परदेशातून सुखद बातम्या येतील. मंगल कार्य, प्रवास ह्यामुळे आपल्या आनंदात भर पडेल. कुटुंबियांसह चांगल्या प्रकारे वेळ जाईल. परदेशगमनाची इच्छा बाळगणारे, तसेच नोकरदारांना लाभ होण्याची शक्यता आहे.

सिंह :-

आज च्या दिवशी मीन राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. ठरविलेल्या कामाकडे लक्ष द्यावे लागेल. धार्मिक किंवा मंगल कार्यात आपणास सहभागी व्हावे लागेल. प्रवास संभवतात. आज आपला संताप वाढल्याने आपले मन अशांत होईल. संतती विषयक काळजी निर्माण होईल. आज व्यवसायात अडथळा येईल. परदेशातील आप्तांकडून खुषालीची बातमी मिळेल.

कन्या :-

आज च्या दिवशी मीन राशीचा चंद्र आज आपल्या सातवा स्थानी असेल. सामाजिक व अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल. उंची वस्त्रे व अलंकाराची खरेदी होईल. वाहनसौख्य मिळेल. भागीदारांशी चांगले संबंध राहातील. पती – पत्नीतील दुरावा संपून जवळीक निर्माण होईल.

तूळ :-

आज च्या दिवशी मीन राशीचा चंद्र आज आपल्या सहावा स्थानी असेल. घरातील सुखा – समाधानाचे वातावरण आपला आनंद वाढीस लावेल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. कामात यश प्राप्ती होईल. माता – पिता ह्यांच्या कडून काही चांगली बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.

वृश्चिक :-

आज च्या दिवशी मीन राशीचा चंद्र आज आपल्या पाचवा स्थानी असेल. आज शक्यतो प्रवासाचे आयोजन करू नये. आरोग्य विषयक चिंता निर्माण होईल. संतती विषयक समस्या निर्माण होतील. मानभंग होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. बौद्धिक चर्चा किंवा वादविवाद ह्यात सहभागी न होणे हितावह राहील. शेअर – सट्टा यांचे आकर्षण हानी करेल.

धनू :-

आज च्या दिवशी मीन राशीचा चंद्र आज आपल्या चवथा स्थानी असेल. आज जास्त संवेदनशीलते मुळे कौटुंबिक गोष्टींत मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. द्विधा मनःस्थिती मुळे मनात चलबिचल वाढेल. आरोग्याच्या दृष्टीने पण दिवस चांगाल नाही. आईच्या तब्बेती विषयी विशेष खबरदारी घ्यावी लागेल. निद्रानाशाचा त्रास होईल. जलाशया पासून जपून राहणे हिताचे ठरेल.

मकर :-

आज च्या दिवशी मीन राशीचा चंद्र आज आपल्या तिसरा स्थानी असेल. आज आपण शत्रूला पराभूत कराल. नवीन कार्यारंभासाठी तयार राहावे लागेल. सफलता मिळेल. प्रत्येक काम जीव लावून कराल. व्यापार – व्यवसायात लाभ होईल. शेअर – सट्ट्यातील गुंतवणूक लाभ देईल. मित्र, स्वकीय व भावंडे यांच्याशी चांगले मेतकूट जमेल. मनाची तगमग दूर होईल. विद्यार्थ्यांना प्राविण्य प्राप्त होईल.

कुंभ :-

आज च्या दिवशी मीन राशीचा चंद्र आज आपल्या दुसरा स्थानी असेल. आज आपल्या द्विधा मनःस्थितीमुळे कोणताही ठोस निर्णय आपण घेऊ शकणार नाही. महत्वाचे निर्णय आज घेऊ नका. वाणीवर ताबा न राहिल्याने कुटुंबियांशी मतभेद होतील. मंगल कार्यावर खर्च होईल. प्रकृती बिघडेल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. नकारात्मक विचार दूर करा.

मीन :-

आज च्या दिवशी मीन राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस आनंद व उत्साहाने परिपूर्ण राहील. घरात एखादे मंगल कार्य ठरेल. नवे काम आरंभ करण्यास दिवस अनुकूल आहे. नातलग, संबंधित व मित्र यांच्याशी भेट – संवाद घडतील. त्यांच्या समवेत बाहेर फिरायला वा जेवणासाठी जाण्याची संधी येईल. प्रवासाची शक्यता आहे. तन – मनाने प्रसन्न राहाल.

हेही वाचलंत का ?

टीम झुंजार