पारोळा l प्रतिनिधी : – एरंडोल विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण राज्यात सध्या अघोषित भारनियमन लादण्यात आलेले आहे. या अघोषित भारनियमनामुळे शहर, ग्रामीण भागातील नागरिकांसह शेतकरी बांधवांची मोठी गैरसोय होत आहे. हे भारनियमन शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीस कारणीभूत ठरणार आहे. अस्मानी संकटाने पाण्या अभावी आधीच शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे आणि त्यात भरीसभर म्हणून वेळी अवेळी होणारे भारनियमन यामुळे पिकाला पाणी नाही.
यावेळी पिकांना मुबलक पाणी मिळाले तरच ही पिके पुढे टिकून राहू शकतात. अशात पिकांना पाणी देणेसाठी सद्यस्थितीत विजेची खूप मोठी आवश्यकता आहे. सदर लोडशेडिंगमुळे शेतकरी बांधवांचा वीजपुरवठा अनियमितपणे बंद करण्यात येतो. सदर वीजपुरवठा बंद पडल्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. वीजपुरवठा हा अनियमितपणे बंद पडत असल्यामुळे शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक यांचे खूप मोठे नुकसान होत आहे.
अशावेळी वीज उपलब्ध करणे अत्यंत आवश्यक आहे. सदरील वीजपुरवठेचा होत असलेला तुटवडा भरून काढण्यासाठी केंद्रीय स्तरावरील ग्रिडमधून रास्त दराने विज खरेदी करण्याचे नियोजन करावे किंवा म.रा.वि.वि.कंपनी तर्फे या बाबत एकतर पुरेसा कोळसा उपलब्ध करून वीजसंच सुरु करावे अथवा हे शक्य नसल्यास अघोषित भारनियमन ऐवजी भारनियमनाची वेळ ही निश्चित करून देण्यात यावी, जेणेकरून शेतकरी, नागरिक, व्यावसायिक, व्यापारी यांना त्यांचे होत असलेले
नुकसान रोखण्यासाठी नियोजन करता येईल. तसेच याबाबत योग्य ते नियोजन करून शेतकऱ्यांसह नागरिकांचे होणारे, हाल, आर्थिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली आहे.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






