यावल तहसिलदारांना महसूल कर्मचाऱ्यांनी दिले निवेदन
यावल : तालुक्यातील शिरसाड जवळ महिला मंडळ अधिकारी यांच्यावर वाळू माफियाने हल्ला केला होता आणि ट्रॅक्टर पळवून नेले होते. तेव्हा या घटनेचा निषेध करीत जळगाव जिल्हा तलाठी संघ, मंडळ अधिकारी व कर्मचारी महसूल कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयात या घटनेचा निषेध केले व तहसिलदारांना निवेदन देत जोपर्यंत संबंधित संशयीतांना अटक होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन पुकारले आहे. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देखील देण्यात आले आहे.
यावल येथील तहसील कार्यालय तलाठी संघटना, मंडळ अधिकारी संघटना व महसूल कर्मचारी संघटना यांच्या वतीने तहसिलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या कडे निवेदन देण्यात आले आहे व शिरागड येथे महिला मंडळ अधिकारी बबीता चौधरी यांच्यावर वाळू माफिया ने केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. व जोपर्यंत संबंधित संशयीतांना अटक होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन कर्मचाऱ्यांनी पुकारले आहे.
सदरचे निवेदन तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, नायब तहसीलदार रशीद तडवी, मंडळ अधिकारी सचिन जगताप, मिलिंद देवरे, हनीफ तडवी, मिलींद देवरे, एस. एल. पाटील, मीना तडवी, तलाठी ईश्वर कोळी, एस. व्ही. सूर्यवंशी, वसीम तडवी, सुचिता देशभ्रदार, हेमा सांगोळे, स्मिता कोळी सह आदींच्या वतीने देण्यात आले आहे तसेच संघटनेच्या सर्व पदाधिकारींनी जळगाव येथे जावुन जिल्हाधिकारी यांच्या कडे देखील निवेदन दिले आहे.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा