बदायू : सासू-सुनेच्या कुरबुरींबाबत आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. पण सुनेच्या मदतीसाठी सासूने आयुष्य पणाला लावल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. गरमीमुळे घराबाहेर अंगणात झोपणाऱ्या एका इसमाची धारदार शस्त्राने वार करून हत्याकरण्यात आल्याच्या घटनेने गावात एकच खळबळ उडाली होती.मात्र या प्रकरणाला आता नवे वळण लागले असून या हत्येसाठी त्याच्या पत्नीलाच अटक करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्रही जप्त केले आहे.
उत्तर प्रदेशातील बदायूं येथील तेजेंद्र सागर (वय 42) असे मृत व्यक्तीचे नाव असून त्याच्या पत्नीनेच त्याची हत्या केल्याचे समोप आले आहे. खरंतर तेजेंद्रची त्याच्या मुलाच्या बायकोवर, म्हणजेच त्याच्या सुनेवर वाईट नजर होती. हे तेजेंद्रच्या पत्नीच्या लक्षात आले होते. या वरून त्यांच्यात कितीतरी वेळा वादही झाले होते, पण तेजेंद्र काही सुधारला नाही. म्हणूनच त्याच्या पत्नीने टोकाचे पाऊल उचलत सुनेच्या इज्जतीसाठी स्वत:च्याच हाताने स्वत:चं कुंकू पुसलं.
पत्नीनेच केली पतीची हत्या…..
मिथिलेश असे आरोपी महिलेचे नाव आहे. तिने दिलेल्या माहितीनुसार तिच्या मुलाचे दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. पण गेल्या वर्षभरापासून तिचा नवरा, तेजेंद्र याची सुनेवर वाईट नजर होती. त्यावरून त्या दोघांमध्ये अनेक वेळा वादही झाले, मात्र तो काही सुधारला नाही. अखेर रात्री ३ च्या सुमारासा ती भयानक घटना घडली.
बिलसी पोलीस स्टेशन हद्दीतील मोहल्ला क्रमांक 8 मध्ये राहणारा तेजेंद्र हा वाढत्या उकाड्यामुळे घराबाहेर झोपला होता. रात्री तेजेंद्रचा कोणीतरी कुऱ्हाडीने शिरच्छेद केला. झोपेत असतानाच त्याची खून झाल्याची माहिती गावात पसरताच एकच हल्लाकोळ माजला. या गुन्ह्याची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्वरित तपास केला, त्यामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली.
रात्री 3 वाजता नेमकं काय घडलं ?……
खरंतर पोलीस तपासात मृत तेजेंद्रची पत्नी मिथिलेशचे नाव पुढे आले. तिची कसून चौकशी केली असता तिने गुन्हा कबूल केला. पती तेजेंद्र तिला रोज मारहाण करायचा आणि सुनेवर त्याची वाईट नजर होती. यामुळे वैतागलेल्या पत्नीने रात्री प्रथम कुऱ्हाडीला धार दिली आणि पहाटे तीन वाजेच्या सुमारास तेजेंद्र गाढ झोपेत असताना कुऱ्हाडीचे अनेक वार करून त्याची हत्या केली. आरोपी महिलेने गुन्हा कबूल केला असून तिला अटक केली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






