धक्कादायक! मुलगी अन् आईच एकाच तरूणा सोबत अफेअर; मुलीनं प्रियकराला सोबत घेवून आईला संपविले, मृतदेह पुरला निर्जनस्थळी.

Spread the love

भुज :- अनैतिक संबंधातून गुन्हे घडल्याच्या घटना सतत समोर येत असतात, मात्र गुजरातमध्ये एक खूपच विचीत्र प्रकरण समोर आले आहे, जे वाचून तुम्हाला देखील अश्चार्यचा धक्का बसेल . गुजरातमधील भुज येथे राहणाऱ्या एका मुलीने चक्क आपल्या प्रियकरासोबत मिळून आपल्याच आईची हत्या केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार. धक्कादायक बाब म्हणजे आई आणि मुली दोघींचं एकाच व्यक्तीसोबत अफेअर सुरू होतं. आपल्या प्रियकरासोबत मुलीचं अफेअर आईला मान्य नव्हतं. म्हणून मुलीने स्वतःच्याच आईची हत्या करम्याची योजना बनवली आणि प्रियकरासोबत मिळून आईला वाटेतून बाजूला केलं. हत्या केल्यानंतर दोघांनी मृतदेह समुद्राच्या किनाऱ्यावर वाळूत पुरून टाकला. याप्रकरमी पोलीसांनी तीन लोकांना अटक केली आहे.

नेमकं झालं काय?……..
काही दिवसांपूर्वी गुजरातच्या माधापार पासून ५५ किमी दूर हमीरमोरा गावाजवळ समुद्र किनाऱ्यावर महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. त्यामुळे पोलिसांनी महिलेचे ओळख पटवणे अवघड झाले होते. महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी महिलेच्या मृतदेहाचे फोटोचे पत्रके छापून सर्वत्र वितरीत केले आणि लोकांना मदतीचे आवाहन करण्यात आले.

पोलिसांनी ग्रामस्थांकडून काही मागील दीड महिन्यापूर्वी चार जण एका सामजिक सोहळ्यासाठी हमीरमोरा येथे आले होते. यानंतर पोलिसांनी या कार्यक्रमाची तारीखेचे कॉल रेकॉर्ड्स मिळवले. त्यांना ज्योतियानाची लोकेशन घटनास्थळीच्या जवळ आढळून आली . पोलिसांनी ज्योतियानाचा शोध घेतला आणि चौकशी सुरू केली. यादरम्यान तिने हत्या केल्याचे मान्य केलं. तपासातून आरोपींनी लक्ष्मीच्या हत्येचा कट रचल्याचे समोर आले.
ओरोपी मुलीने सांगितले की, १३ जुलै रोजी हमीरमोरा येथे पोहचले आणि योजनेनुसार समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेले. तेथे जोतियाना ने कुठल्यातरी वस्तुने पीडितेच्या डोक्यात वार केले. यानंतर महिलेच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह निर्जनस्थळी पुरण्यात आला.

प्रकरण काय आहे?

सात वर्षांपूर्वी लक्ष्मीने जीतेंद्र भट्ट याच्यासोबत लग्न केलं होतं. हे त्यांचं दुसरं लग्न होतं. दरम्यान लक्ष्मी यांची पहिल्या लग्नातून झालेली एकुलती एक मुलगी देखील माधापर येथे सोबत राहत होती. सहा महिने आधी लक्ष्मी पेंटिंगचं काम करणाऱ्या जोतियानाच्या प्रेमात पडली. इतकेच नाही तर लक्ष्मी आणि तिच्या नवऱ्यामध्ये या अफेअर बद्दल माहिती झाल्यानंतर भांडणे होऊ लागली होती. यादरम्यान तब्बल तीन महिने आधी १७ वर्षीय मुलीने जोतियाना सोबत पेंटिंगचं काम करणे सुरु केलं आणि दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. लक्ष्मीला त्यांच्या अफेअरबद्दल माहिती झाल्याने तिची मुलीसोबत सतत भांडणं होत होती.

हे पण वाचा

टीम झुंजार