अकोला :- उपचारासाठी गेलेल्या तरुणीला डॉक्टरने अश्लील स्पर्श करत तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. यानंतर तरुणीने रामदासपेठ पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.
तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सदर डॉक्टविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. प्रसिद्ध डॉक्टरने केलेल्या या प्रकारामुळे अकोला शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आरोपी डॉक्टर फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
काय घडलं नेमकं?…
पीडित तरुणी अमरावती येथे शिक्षणासाठी असते. रक्षाबंधनानिमित्त तरुणी अकोला येथे घरी आली होती. तरुणीला किडनी स्टोनचा त्रास आहे. यामुळे तरुणी शहरातील प्रसिद्ध हार्ट आणि किडनी स्टोन स्पेशालिस्ट डॉक्टरकडे भावासोबत गेली. डॉक्टरने भावाला बाहेर थांबवून तरुणीला एकटीला केबिनमध्ये चेकअपला घेतले. चेकअप करता करता डॉक्टर तिच्याशी अश्लील चाळे करु लागला.
चेकअप करताना डॉक्टरचे अश्लील कृत्य…
चेकअप करताना डॉक्टरने तरुणीचे कपडे वर केले. मग तिच्या प्रायव्हेट पार्टला हात लावला. तरुणीने डॉक्टरला जाब विचारला असता आपण असेच चेकअप करतो असे डॉक्टरने सांगितले. यानंतर डॉक्टरचे कृत्य पाहून तरुणीने आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून भाऊ आत आला. तरुणीने भावाला घडला प्रकार सांगितला. भावाने डॉक्टरला सुनावले. यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दोघा बहिण-भावाला बाहेर काढले.
तरुणीने थेट पोलीस ठाणे गाठत डॉक्टरविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेनंतर डॉक्टर फरार झाला आहे. डॉक्टरने याआधीही एका महिलेसोबत अश्लील वर्तन केल्याची माहिती मिळते.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






