जालना जिल्ह्यातील घटनेचा जामनेरात सकल मराठा समाजातर्फे ठिय्या निषेध आंदोलन.

Spread the love

फडणवीस यांच्या विरोधात घोषणा देतेवेळी शाब्दिक वाद जामनेर(प्रतिनिधी):- जालना जिल्ह्यातील लाठीचार्ज घटनेचा निषेध म्हणून जामनेर तालुक्यातील सकल मराठा समाजाकडून राजमाता जिजाऊ चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले.ठिय्या आंदोलनात विविध पक्ष,संघटना यांनी पाठिंबा नोंदविला.राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करूनही आरक्षणाचा तिढा निकाली लागत नसल्याने शासनाच्या उदासीन कारभार चव्हाट्यावर आला असल्याचे ठिय्या आंदोलना दरम्यान वक्त्यांनी बोलुन दाखवले.

जालना जिल्ह्यातील लाठीचार्जची जबाबदारी राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांनी घेऊन त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलनच्या वेळी करण्यात आली. सकल मराठा समजाच्या ठिय्या आंदोलनावेळी वंदना चौधरी, संजय गरूड, दिलीप खोडपे,डॉ.प्रशांत पाटील, किशोर पाटील, नाना पाटील,किरण पाटील, एस.टी. पाटील, शंकर राजपूत, अशफाक पटेल, राजू खरे,प्रदीप गायके, मनोज महाले,राहुल चव्हाण,प्रल्हाद बोरसे,जावेद मुल्लाजी,किशोर खोडपे,अनिल बोहरा, माधव चव्हाण,आदिसह समाज बांधव व विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.मात्र यावेळी भाजपातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आंदोलनात जवळपास सहभागी होण टाळल्याचे जाणवलं.एकंदरीत भाजपा सोडुन सगळ्या पक्षांनी निषेधात सहभागी नोंदविला.

ठिय्या आंदोलनात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी या बोलत असताना. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणा देत असताना उपस्थित असलेले भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी घोषणाबाजी वर आक्षेप घेतला.यावेळी थोडे शाब्दिक वाद झाले.

हे पण वाचा

टीम झुंजार