यावल :- तालुक्यातील बामणोद येथील एका १९ वर्षीय युवकाने तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली. देवेंद्र पंकज पाटील (वय १९, रा.इंदिरानगर, बामणोद ता. यावल) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याप्रकरणी फैजपुर पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बामणोद येथे देवेंद्र पाटील हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याने रविवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास भुसावळ जवळील तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, यात तापी नदीच्या पुलावरून उडी घेतल्या नंतर झालेल्या गंभीर दुखापतीमुळे तो गंभीर जखमी झाला. यास उपचारासाठी खाजगी रुग्णालयात घेवुन जात असतांना उपचारापुर्वी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटनासमोर आली आहे.
या संदर्भात मयताचा भाऊ भूषण पंकज पाटील यांनी फैजपुर पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल गोकुळ तायडे करीत आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आले नाही.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






