पुणे :- नुकताच अधिक महिना गेला. या महिन्याला धोंड्याचा महिना म्हटला जातो. जावाई अन् मुलीला बोलवून धोंड्याचे वाण दिले जाते. परंतु पुणे जिल्ह्यातील या जावायाने असे काही प्रकार केले की त्याचा ताप सर्वांना झाला.सासू, मेहुणी अन् इतर कुटुंब वेठीस धरले गेले. प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. पोलिसांनी काही तासात या प्रकरणाचा छळा लावला. ही घटना रक्षाबंधनाच्या दिवशी घडली. या प्रकरणात जावायास अटक करण्यात आली आहे.
नेमका काय घडला प्रकार…..
पुणे शहराजवळील पिंपरी- चिंचवडमध्ये जावयाची करामत बघायला मिळालीय. या ठिकाणी असलेल्या ४५ वर्षीय सचिन मोहिते याला सासूकडून दहा लाख रुपये हवे होते. खंडणी उकळण्यासाठी स्वतःच्या मुलीसह मेहुणीच्या मुलीचे रक्षाबंधनाच्या दिवशी अपहरण केले. त्यांना वाघोलीच्या घरी डांबून ठेवले. रक्षाबंधनाच्या दिवशी राखी आणण्यासाठी गेलेल्या मुली घरी परत न आल्याने सचिन मोहिते यांच्यासह मुलींच्या आईने वाकड पोलिसात तक्रार दिली. नातींचे अपहरण केल्याने सासू पैसे देईल, या उद्देशाने सचिन मोहिते याने अपहरण कट रचला. परंतु पोलिसांचा तपासात हा सर्व प्रकार उघड झाला. पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले.
तीन महिन्यांपूर्वी रचला कट……
45 वर्षीय सचिन मोहिते याने तीन महिन्यांपूर्वी अपहरणाचा कट रचला. तेव्हाच मेहुणीचा मोबाईल त्याने चोरला होता. तोच मोबाईल गुन्ह्यासाठी वापरला. रक्षाबंधनाच्या दिवशी स्वतःच्या मुलीचे आणि मेहुणीच्या मुलीचे अपहरण केले. प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्यानंतर चौकशी सुरु झाली. त्यावेळी तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांना संशय आला. त्याला ताब्यात घेतले. पोलीस खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली देत मुलांना वाघोली येथील घरात ठेवल्याचे सांगितले.
मेहुणीने दिली होती फिर्याद
सचिन मोहिते याची मेव्हणी सारिका कैलास ढसाळ (वय ३८ , रा. रहाटणी) हिने पोलिसांत फिर्याद दिली होती. तिची दोन वर्षांची मुलगी आणि सचिन मोहिते याची १५ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याचे पोलिसांना कळवले. त्यानंतर वाकड पोलिसांनी मुलींचा शोध सुरू केला. त्यानंतर सचिन मोहिते याच्या जबाबात विसंगतीमुळे पोलिसांना संशय बळावला आणि प्रकार उघड झाला. काही तासातच या अपहरणाचा कट उघड करत आरोपीला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






