पुणे : पार्टीत जबरदस्तीने आग्रह करुन तरुणीला दारु पाजली.दारुमुळे त्रास होऊ लागल्याने तिला हॉटेलमध्ये नेऊन तेथे तिच्यावर अत्याचार केला. तिचे न्युड फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी पिंपरी सौदागर येथील एका २८ वर्षाच्या तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ५८५/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अभिषेक सत्तुजी टिक्कल (रा. चंदननगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिषेक टिक्कल याने जुलै २०२२ मध्ये फिर्यादीस पार्टीसाठी विमाननगर येथील ईफिनगट क्लबमध्ये बोलावून घेतले. पार्टीत ड्रिक घेण्याचा आग्रह केला.
तिने नकार दिल्यानंतरही जबरदस्तीने आग्रह करुन दारु पिण्यास लावली. दारु मुळे फिर्यादीला त्रास होऊ लागला. तेव्हा त्याने दारुच्या नशेत फिर्यादींना लेमन ट्री हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. तिचे न्युड फोटो काढले. त्यानंतर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन इतर ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केला.
या सततच्या अत्याचाराचा कंटाळून शेवटी फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक गोताडे तपास करीत आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






