प्रतिनिधी l चाळीसगाव
चाळीसगाव तालुका तेली समाजाच्यावतीने दि 3 सप्टेंबर रोजी तेली समाज मंगल कार्यालयात वार्षिक सर्वसाधारण सभा व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत चाळीसगाव ग्रामीण व शहरी असे एकूण 175 विद्यार्थी-विद्यार्थिनींसह विविध क्षेत्रात यश,निवड झालेल्या मान्यवरांचा देखील यावेळी गौरव करण्यात आला. ट्रिपल महाराष्ट्र केसरी तथा आंतरराष्ट्रीय गोल्ड मेडलिस्ट विजय चौधरी यांना चाळीसगाव तालुका तेली समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
तसेच स्व. मधुकर उखाची चौधरी यांना मरणोत्तर समाजरत्न पुरस्कार त्यांचे कुटुंबीयांना बहाल करण्यात आला.सदर कार्यक्रम तालुका तेली समाजाचे अध्यक्ष सुरेश हरदास चौधरी यांचे अध्यक्षतेखाली झाला. गुणगौरव सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ट्रिपल महाराष्ट्र केसरी तथा (DYSP)विजय नथू चौधरी, ह.भ.प. प्रा. डॉ.योगिताताई पांडुरंग चौधरी (शेंदुर्णी),कृष्णा रमेश चौधरी (तुरुंग अधिकारी नाशिक), डॉ.भूषण शिवराम चौधरी (माती सुपिकता शोधक उपकरण संशोधक, बहाल), श्री.अनिल राजेंद्र चौधरी (सीनियर सेक्शन इंजिनियर सेंट्रल रेल्वे,तरवाडे) यांची उपस्थिती होती.
तसेच व्यासपीठावर नथू चौधरी,सतीश दराडे,शहर तेली समाजाचे अध्यक्ष-दिलीप चौधरी, मा.नगरसेवक राजेंद्र चौधरी, तालुका तेली समाजाचे उपाध्यक्ष भिकन अण्णा चौधरी,शांताराम चौधरी,आर.के.चौधरी,भारत चौधरी, बाळासाहेब चौधरी,सोमनाथ चौधरी, सचिव – गोकुळ चौधरी, कार्याध्यक्ष – रामलाल चौधरी,अमृत चौधरी,शहर तेली समजाचे सचिव पवार गुरुजी उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांनी विद्यार्थी व पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले.
सर्वसाधारण सभेचे अजेंडा वाचन सेक्रेटरी गोकुळ चौधरी यांनी तर सूत्रसंचालन सहसचिव विवेक चौधरी यांनी केले. तर प्रमाणपत्रांचे वाचन रामलाल चौधरी, मनोज चौधरी, ईश्वर चौधरी,मनोज करंकाळ,भागवत चौधरी, दत्तू चौधरी,निंबा चौधरी, यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज चौधरी यांनी तर आभार रामलाल चौधरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी चाळीसगाव तालुका तेली समाज कार्यकारणीतील सर्व पदाधिकारी व सदस्यांसह शहर तेली समाजाचे देखील मोलाचे सहकार्य लाभले.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






