प्रतिनिधी l अमळनेर :- मागील भांडणाचा वाद डोक्यात ठेवून ज्वलनशील पदार्थाने घराला आग लावणाऱ्या एकाला अमळनेर न्यायालयाने सहा वर्षाची शिक्षा सुनावली आहे. आरोपी देवेंद्र पांडुरंग पाटील वय २४ रा.मोरया नगर चाळीसगाव याने फिर्यादी युवराज आधार पाटील रा.पाटील गढी चोपडा यांच्या घरी पूर्वी झालेल्या बहीण पाहुण्यांचा वाद संगनमताने पोलीस स्थानकात मिटल्यावर देखील तो वाद डोक्यात ठेवून आरोपीने फिर्यादी व त्याचा मुलगा यास तुझ्या पोरांना समजावून सांगा अशी धमकी देऊन मुलगा प्रशांत ची कॉलर पकडुन लाथांनी मारहाण केली.
व तुला पुण्याला बघतो,तुझी नोकरी संपवतो.तुझ्या घरच्यांना पण बघतो,तुम्ही येथे कसे राहतात.तुमचे घर जाळून टाकेल.तुमची राख केल्याशिवाय राहणार नाही अशी धमकी देऊन बहीण व भाचीला घेऊन चाळीसगाव निघून गेला.दि.२४ नोव्हेंबर २०२१ रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास फिर्यादी घरात झोपलेले असतांना घराच्या पहिल्या गॅलरी मधून घरात प्रवेश केला.घरातील लाकडी दरवाजा,पडदे,गॅस सिलेंडर वर डिझेल सारखे ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली.त्यात घर जळल्याने घराचे नुकसान झाले.
भादवी कलम 436,448,427,432 नुसार चोपडा शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर खटल्यात ९ साक्षीदार तपासण्यात आले.त्यात फिर्यादी,प्रत्यक्ष दर्शी साक्षीदार,सरकारी पंच,नोडल अधिकारी,आरोपीचे लोकेशन शोधणारे अधिकारी,व शेजारील रहिवासी,तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक संतोष चव्हाण यांची साक्ष महत्वाची ठरवत जिल्हा न्यायाधीश वर्ग १ पी आर चौधरी यांनी आरोपीस भादवी कलम ४३६ मध्ये सहा वर्षे कारावास व ५०० रुपये दंड,दंड न भरल्यास १५ दिवस कारावास,भादवी कलम ४४८ मध्ये २ महिने शिक्षा व १०० रुपये दंड,दंड न भरल्यास ७ दिवस शिक्षा,
भादवी कलम ४२७ मध्ये १ महिने कारावास व भादवी कलम ४३२ मध्ये ३ महिने शिक्षा व १०० रुपये दंड,दंड न भरल्यास सात दिवस शिक्षा सुनावली.सरकार पक्षातर्फे सरकारी वकील किशोर बागुल यांनी युक्तिवाद केला.तर पैरवी अधिकारी सहायक फौजदार उदयसिंह साळुंखे,पोलीस हेड कॉन्स्टेबल हिरालाल पाटील,पोलीस कॉन्स्टेबल नितीन कापडणे,अतुल पाटील,राहुल रणधीर यांनी काम पाहिले.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






