प्रतिनिधी | अमळनेर :- येथून जवळच असलेल्या वावडे येथे ३३ वर्षीय तरुण शेतकऱ्याने शेतातच झाडाला गळफास लावून आत्महत्या केली केल्याची दुर्दैवी घटना काल ५ रोजी दुपारी घडली आहे.नितीन लोटन पाटील असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.तर त्या आधीच्या दिवशी रात्री सालदार गडीचा अविवाहित १६ वर्षीय मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली त्याचे नाव संजय रोहिदास देवरे असे आहे ,एकाच गावात दोन दुर्दैवी घटना घडल्याने एकच हळहळ व्यक्त होत आहे.
वावडे येथील नितीन लोटन पाटील (वय ३३) हा शेती करून उदरनिर्वाह करत होता. दिनांक ५ रोजी त्याने जुपने केलेल्या शेतात निंबाच्या झाडाला दोराच्या सहाय्याने गळफास लावून घेतल्याचे समजताच त्याचे काका व ग्रामस्थांनी त्याला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. त्याच्या पश्चात पत्नी, दोन वर्षाचा मुलगा, चार वर्षाची मुलगी, आई वडील, भाऊ असा परिवार आहे.
नितीन हा काही दिवसांपासून दुष्काळ व त्यामुळे असलेली नापिकी त्यातच डोक्यावर असलेल्या कर्जाच्या विवंचनेत असल्याची गावातून माहिती मिळाली आहे. नीलकंठ पाटील यांच्या खबरी वरून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोना सुनील तेली करीत आहे. दिनांक ४ रोजी ही रात्री एका सोळा वर्षीय शेतमजूर असलेल्या मध्यप्रदेशातील सालदार गडी म्हणून काम करणाऱ्याचा संजय रोहिदास देवरे ( रुल्या ) वय १६ या तरून मुलाने रुल्या शेतमजूराने वावडे येथे गळफास घेतला होता व दुसऱ्या दिवशी तरुण शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्येमुळे गावात शोककळा पसरली आहे.दोन्ही घटनेचा तपास हवालदार भरत इसी हे करीत आहेत
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






