प्रतिनिधी l अमळनेर :- तिकीट काढून घे असे बोलण्याचा राग आल्याने एकाने वाहक व बस चालक यांना शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या एकाला अमळनेर न्यायालयाने आठ महिन्याचा कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत असे की बस महिला वाहक ह्या दि.४ जानेवारी २०२२ रोजी चोपडा-अडावद ह्या बसमध्ये कर्तव्य करीत असतांना आरोपी रतीक झुलाल पाटील वय २९ रा.कमळगाव ता.चोपडा हा सीट वर बसून मोठ्या आवाजात गाणे ऐकत होता.
वाहकाने त्यास तिकिटाबाबत विचारणा केली असता. त्याने प्रतिसाद दिला नाही.परत तिकिटाबाबत विचारणा केल्याने त्यास त्याचा राग आला.आणि कमळगाव आल्यावर त्याने वाहकास जोरदार धक्का दिल्याने वाहक बस मधून खाली पाडून शिवीगाळ करू लागला व कानाखाली मारली .याबाबत चालक यांनी विचारले असता त्याने चालकाला देखील मारहाण करण्यास सुरुवात केली.याबाबत चोपडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर खटल्यात आठ साक्षीदार तपासण्यात आले.त्यात फिर्यादी,बस चालक प्रत्यक्ष दर्शी,सरकारी पंच,तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील यांची साक्ष महत्वाची ठरवत जिल्हा न्यायाधिश वर्ग १ पी आर चौधरी यांनी आरोपीस भादवी कलम ३३२ नुसार आठ महिने शिक्षा तसेच कलम कलम ३५३ मध्ये आठ महिने शिक्षा सुनावली.सरकार पक्षातर्फे सरकारी वकील किशोर बागुल यांनी युक्तिवाद केला.तर पैरवी अधिकारी सहायक फौजदार उदयसिंह साळुंखे,पोलीस हेड कॉन्स्टेबल हिरालाल पाटील,पोलीस कॉन्स्टेबल नितीन कापडणे,अतुल पाटील,राहुल रणधीर यांनी काम पाहिले.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






