Worst unhealthy breakfast foods to avoid in the morning सकाळी नाश्त्याला आपण घाईघाईत काय खातो याचा विचार करा, चूक झाली की तब्येत बिघडेल
नाश्ता हा एखाद्या राजाप्रमाणे करावा, असे म्हटले जाते. सकाळचा नाश्ता हा खूप महत्वाचा असतो. नाश्त्यामध्ये खालेल्या पदार्थांमुळे दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते, तसेच इतरही न्यूट्रिशन मिळतात. मात्र, धावपळीच्या या जीवनशैलीत अनेकांना आरोग्यदायी पदार्थ खाण्यास वेळ मिळत नाही. काही लोकं तर नाश्त्याकडे दुर्लक्ष करतात. पण ही सवय आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
काही जणांना नाश्त्यामध्ये काय खावं काय टाळावं याची माहिती नसते. योग शिक्षिका स्मृती यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यांच्या मते, ‘काही पदार्थ नाश्त्यामध्ये अजिबात खाऊ नयेत. यामुळे पचनाच्या संबंधित त्रास, जसे कि ब्लोटिंग, बद्धकोष्ठता, अॅसिडिटी आणि इतर अनेक आजार छळू शकतात’
सूर्यकिरणांवर अवलंबून असते पचन.

योग शिक्षिका स्मृती यांच्या मते, ‘आपली पचनसंस्था सूर्यकिरणांवर अवलंबून असते. याला जठराग्नी असे म्हणतात. यूव्हीबी किरणांमुळे व्हिटॅमिन डी तयार होते. निरोगी आतडे राखण्यासाठी व्हिटॅमिन डी महत्वाचे आहे. त्यामुळे सकाळचा ब्रेकफास्ट आणि रात्रीचं जेवण, लवकर पचेल अशा आहाराने करावा असा सल्ला देण्यात येतो. दुपारच्या वेळी आपण हेल्दी पदार्थ व पोटभर अन्न खाऊ शकता.
सकाळी हे पदार्थ खाणं टाळा.

सकाळी ब्रेकफास्टमध्ये थंड फळांचा रस, स्मूदी किंवा शेक पिणे टाळा. कारण याचा थेट परिणाम पचनशक्तीवर होतो. सकाळी शक्यतो थंड असणारे पदार्थ किंवा फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न खाणं टाळावे.
फळ आणि दूध चुकीचं कॉम्बिनेशन

काही जण सकाळी नाश्त्यामध्ये फळे आणि दूध एकत्र करून खातात. जे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. काही जण दुधात केळी मिक्स करून खातात. हे पोटासाठी जड ठरू शकते. आयुर्वेदानुसार सकाळी दूध आणि केळी एकत्र करून खाऊ नये.
सकाळी ओट्स खाणं चुकीचं.

ओट्स हेल्दी मानले जातात. पण सकाळच्या नाश्त्यामध्ये ओट्स खाणं टाळा. नाश्त्यात ओट्स, इन्स्टंट फूड, कॉर्न फ्लेक्स न खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. कारण सकाळच्या कालावधीला कफ कालावधी असे म्हणतात. सकाळी ओट्सचे पचन योग्यरित्या होत नाही. त्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि शरीरात विषारी पदार्थ तयार होऊ लागतात.
नाश्त्यात काय खावे ?

- बाजरी, नाचणी, रवा किंवा गव्हाची लापशी.
- मुग डाळ किंवा तांदुळाची खिचडी.
- मुग डाळीचा पोळा.
- नाचणीचे पदार्थ.
- घरगुती आयुर्वेदिक स्मूदी.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






