चाळीसगाव :- मा. पोलीस अधिक्षक सो. श्री. एम. राजकुमार यांचे आदेशान्वये तसेच मा. श्री रमेश चोपडे, अपर पोलीस अधिक्षक चाळीसगाव परीमंडळ, मा. श्री अभयसिंह देशमुख सहायक पोलीस अधिक्षक चाळीसगाव उपविभाग यांचे मार्गदर्शानाखाली चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हे शोध पथकाची नव्याने रचना करण्यात आलेली आहे. सदर पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना पोलीस स्टेशन हद्दीत मालमत्ते संदर्भातील चोरीचे गुन्हे होऊ नयेत या साठी योग्य त्या सुचना देण्यात आलेल्या आहेत तसेच त्यांच्यावर आळा घालणेकामी पोलीस स्टेशन हद्दीत विभागनिहाय कर्मचारी नेमुन दिवसा व रात्रौ परीणाम कारक दररोज गस्त नेमण्यात येते. सदर कर्मचारी यांनी मागील काळात चोरीचे गुन्हे करणाऱ्यावर प्रतिबंध करुन, तसेच सदर चोरट्यांना जेरबंद करुन चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.
अश्याचप्रकारे काल दि. 05/09/2023 रोजी रात्री ०९.३० वा. ते दि. 06/09/2023 रोजीचे सकाळी ०९.३० वाजेच्या दरम्यान रात्रौगस्त अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री दिपक बिरारी व गुन्हे शोध पथकातील कर्मचारी यांची रात्रौगस्त कामी पोलीस स्टेशन कडुन नेमणुक करण्यात आलेली होती. सदर अधिकारी व कर्मचारी यांना योग्य त्या सुचना मा. पोलीस निरीक्षक श्री संदिप पाटील यांनी गस्तकामी दिलेल्या होत्या. सहा. पोलीस निरीक्षक श्री दिपक विरारी, चालक पोहेकॉ नितीन वाल्हे, पोकॉ विजय पाटील, पवन पाटील, समाधान पाटील असे शहरात शासकीय वाहनावर चाळीसगाव शहरात दि. 06/09/2023 रोजी रात्री ०३.३० वाजता गस्त करीत असतांना, त्यांना भडगाव रोड अंथ शाळेजवळुन दोन संशयित इसम मोटर सायकलवर एका पिशवीत काहीतरी घेवुन जातांना दिसले तेव्हा सहा. पोलीस निरीक्षक श्री दिपक बिरारी यांनी सदर संशयित इसमांना थांवण्याचा इशारा केला असता
ते इसम न थांबता त्यांचेकडील मोटर सायकलीवर भरधाव वेगाने पळुन जाऊ लागले. त्यांचा शासकीय वाहनाच्या सहायाने पाठलाग करुन त्यांना पळुन जाण्याची संधी न देता, सदर इसमांना शिवाजी चौकात पकडले. सदर ठिकाणी लागलीच दोन पंचांना बोलावुन सदर इसमांकडील पिशवी चेक केली असता, सदर पिशवीत अंदाजे १५,०००/- रुपये किमतीचे ३ किलो वजनाचे चंदनासारखे दिसणारे लाकुड व झाडे तोडण्यासाठी वापरण्यात येणारी एक कुन्हाड, गिरमीट, लोखंडी करवत असे साहीत्य मिळुन आले. तरी सदर संशयित इसमांनी कोठेतरी चंदनाचे झाड तोडुन त्यातील गाभ्याची चंदन काढुन त्याची चोरी केल्याचे प्रथमः दर्शनी दिसुन आल्याने त्यांना त्याबाबत विचारपुस करता त्यांनी कोणतीही समाधान कारक उत्तरे दिली नाहीत.
सदर आरोपीतांचे ताब्यातुन एक मोटर सायकल दोन मोबाईल व वरील चंदन चोरी कामी लागणारे साहीत्य असा एकूण 58,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन ताब्यात घेण्यात आलेला आहे. सदर आरोपीतांवर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुरन ४४२ / २०२३ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन जप्त करण्यात आलेले चंदनाचे वन विभागाकडुन परीक्षण करुन त्यांचेकडुन चंदन असल्याचा अभिप्राय घेवुन पुढील कार्यवाही करण्याची तजविज ठेवण्यात आली आहे. सदर ताब्यात घेतलेल्या आरोपीतांची नावे १) शेख अमीन शेख हजिज वय ५२ वर्षे २) अशोक लक्ष्मण आव्हाड वय ४५ वर्षे दोन्ही रा. हस्ता ता. कन्नड जि. औरंगाबाद, अशी आहेत.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक सो. श्री एम. राजकुमार, मा. श्री रमेश चोपडे अपर पोलीस अधिक्षक सो. चाळीसगाव परीमंडळ, मा. श्री अभयसिंह देशमुख सहायक पोलीस अधिक्षक चाळीसगाव उपविभाग यांचे मार्गदर्शानाखाली मा. पोलीस निरीक्षक श्री संदिप पाटील, मा. श्री राहा. पोलीस निरीक्षक श्री दिपक बिरारी, पोना महेंद्र पाटील, भुषण पाटील, पोकों विजय पाटील, समाधान पाटील, पवन पाटील, राकेश महाजन, आशुतोष सोनवणे, रविंद्र यच्छे, ज्ञानेश्वर गिते, ज्ञानेश्वर पाटोळे असे कर्मचारी व अधिकारी यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोना महेंद्र पाटील व पोकॉ विजय पाटील हे करीत आहेत..
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






