एरंडोल l प्रतिनिधी
एरंडोल :- येथे लाड शाखिय वाणी समाज व लाडशाखीय महिला मंडळ एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विविध मान्यवरांचा रक्षाबंधनाच्या कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.सदर कार्यक्रमास एरंडोल शहरातील मान्यवर निवृत्त तहसीलदार अरुण माळी पोलीस निरीक्षक सतीश गोराडे प्राचार्य ए जी पाटील आगार प्रमुख नीलिमा बागुल मुख्याध्यापिका सुरेखा मानुधने मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष प्रा. मनोज पाटील ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव अहिरराव मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष संजय चौधरी माजी नगरसेवक नरेंद्र पाटील व निवृत्त सैनिक गणेश शिंदे अनिल पाटील काशिनाथ पाटील भागवत पाटील समाधान पाटील जितेंद्र पाटील रघुनाथ सुतार कृष्णा महाजन रितेश शर्मा दिलीप बडगुजर उपस्थित होते.
यावेळी लाड शाखिय वाणी समाज महिला मंडळाच्या वतीने कार्यक्रमासाठी आलेले मान्यवर व निवृत्त माजी सैनिक यांना राखी बाधून साजरा करण्यात आला.
यावेळी पोलीस निरीक्षक सतीश गोराडे म्हणाले की शासनाने महिला भगिनीं साठी 112 हा नंबर दिला आहे या नंबरवर फोन करून आपल्या अडीअडचणी, समस्या,व काही त्रास आल्यावर तत्काळ आम्हाला या नंबर कळवा आम्ही लगेच हजर होवून समस्याचे निवारण करू असे सागितले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान निवृत्त तहसीलदार अरुण माळी यांनी स्वीकारले प्रास्ताविक व सूत्रसंचालन घरटे सर रघुनाथ कोठावदे यांनी केले इस्तवन व स्वागत गीत वैशाली शेंडे व शुभांगी दुसे यांनी केले मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली उपस्थित सर्व मान्यवरांना उपस्थित वाणी समाज मंडळाच्या महिलांनी राखी बांधली मान्यवरांनी महिला जागरूकता विषयी आपले मनोगत व्यक्त केले आभार प्रदर्शन किशोर मोराणकर यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी महिला मंडळ अध्यक्ष शालिनी कोठावदे सुषमा मेने सीमा बागड वैशाली शेंडे सारिका शिरोडे शुभांगी दूसे रत्ना नाकवे नाना बागड महेश शिरोळे देवेंद्र येवले शुभम मोराणकर गौरव दुसे यांनी परिश्रम घेतले
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






