नाशिक :- मधील एका मोठ्या नेत्याने उद्धव ठाकरे यांना रामराम ठोकला. उद्धव ठाकरे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. असे असताना ठाकरे गटाच्या उपनेत्याने आपल्या पदाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांना व्हॉट्सअप केला.गेल्या काही दिवसांपासून ते नाराज होते. आपल्याला डावलले जात असल्याचं त्यांना वाटत होतं. त्यामुळे पाच वेळा आमदार राहिलेल्या मोठ्या नेत्याने उद्धव ठाकरे यांच्यापासून फारकत घेतली आहे. नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बबनराव घोलप यांनी उद्धव ठाकरे यांना पदाचा राजीनामा व्हॉट्सॲप केल्याची सूत्रांची माहिती आहे. शिर्डीत लोकसभा मतदारसंघात नव्या संपर्कप्रमुखांची निवड केल्याने बबनराव घोलप नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे.
म्हणून होते नाराज….
बबनराव घोलप सध्या आउट ऑफ कव्हरेज आहेत. बबनराव घोलप शिर्डी लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. काही दिवसांपूर्वी शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानले जात असल्याने बबनराव घोलप नाराज होते.
पाच वेळा राहिले आमदार……
बबनराव घोलप हे माजी मंत्री आहेत. देवळाली मतदारसंघात 5 वेळा आमदार राहिले आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतानाच एका मोठ्या नेत्याने पदाचा राजीनामा दिला. नुकत्याच उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या शिर्डी, संगमनेर दौऱ्यात देखील बबनराव घोलप यांना डावलण्यात आले होते.
बबनराव घोलप यांनी ३० वर्षे एकहाती वर्चस्व ठेवलं. शिवसेनेचे दोन गट झाले. त्यात भाजपची ताकद वाढली. परंतु, तीस वर्षांची सत्ता कायम ठेवण्यासाठी त्यांनी फिल्डिंग लावली होती. आपल्या लेकीला उभं करण्याचं ते स्वप्न पाहत होते. पण, भाऊसाहेब वाकचौरे पक्षात आल्याने ते अस्वस्थ होते. त्यामुळे नाराज झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जातं.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






