
डोंबिवली :- देवदर्शन करून घरी परतणाऱ्या महिलेवर दोन रिक्षा चालकांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवली भागात घडला. सुदैवाने गस्तीवर असणाऱ्या मानपाडा पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रसंगवधान व धाडसामुळे महिलेचा जीव वाचला असून दोन्ही नराधम गजाआड करण्यात यश आले आहे.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, डोंबिवली पूर्वेतील कोळेगाव परिसरात राहणाऱी एक महिला शुक्रवारी संध्याकाळी खिडकाळेश्वर मंदिरात गेली होती. दर्शन घेऊन घरी जाण्यासाठी की एका रिक्षात बसली. त्यात एक प्रवासी आधीच बसला हाेता. महिलेने रिक्षा चालकाला कोळेगावात जायचे असे सांगितले. परंतु रिक्षा चालकाने रिक्षा एका निर्जनस्थळाकडे वळवली. महिलेला संशय आल्याने तिने आरडा ओरडा केला.
मात्र शेजारी बसलेल्या प्रवाशाने शस्त्राचा धाक दाखवत महिलेला निर्जनस्थली नेले. याच दरम्यान गस्तीवर असणारे मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलिस बीट मार्शल सुधीर हसे आणि अतुल भोई यांना याचा संशय आला. दोघांनी या रिक्षाचा पाठलाग करत नराधमांना पकडले. यावेळी आरोपीने एका पोलिसावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस सुधीर हसे हे गंभीर जखमी झाले.
मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरेश मदने हे घटनास्थळी दाखल झाले. दोघाही नराधमाना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी प्रभाकर पाटील हा रिक्षा चालवतो. तर त्याचा साथीदार वैभव तरे हा देखील रिक्षा चालक आहे. वैभव याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






