सोयगाव, ता.१३…सोयगाव सह परिसरातील १५ ते २० गावात रानडुक्करांचा मोठ्या प्रमाणावर शेतात मुक्त संचार सुरू आहे या रानडुक्करांचा कळपांनी घोसला शिवारातील शेती पिकांसह उध्वस्त केल्याचा खळबळ जनक प्रकार बुधवरी उघडकीस आला आहे त्यामुळे सोयगाव परिसरातील १५ ते २० गावातील शेतकरी रानडुक्करांचा कळपांनी हतबल झाले आहे ऐन फुल पात्यावर आलेल्या कपाशीच्या कैऱ्या व फांद्या मोडून शेती सपाट करण्याचा धडाका रानडुक्करांचा कळपांनी लावला आहे
घोसला शिवारात ज्ञानेश्वर युवरे व सुधाकर युवरे या दोन्ही शेतकऱ्यांच्या दहा एकरवरील कपाशीच्या पिकांची नुकसान रानडुक्करांचा कळपांनी केले आहे
सोयगाव सह परिसरात रावेरी कंकराळा माळेगाव पिंपरी जरंडी बहुलखेडा निंबायती रामपुरा तांडा कवली निमखेडी उमर विहिरे तिखी या शिवारातील शेती क्षेत्रात रानडुक्करांचा कळपांनी धुडगुस घालून ऐन कपाशीच्या पिकांची नुकसान सुरू केले आहे ही रानडुक्करांची कळपे चक्क शेतात पिकांची कैऱ्या फस्त करून शेतीच्या सपाटी करणं करत आहे
घोसला शिवार अक्षरशः या रानडुक्करांचा कळपांनी उध्वस्त केले आहे वनविभागाच्या वतीने या रानडुक्करांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी शेतकरी ज्ञानेश्वर युवरे यांनी केली आहे दरम्यान वन्यप्राण्यांच्या नुकसानी साठी वनविभागाच्या वतीने जाचक अटी घालून दिलेल्या आहे त्यातच मिळणारी मदत तुटपुंजी आहे त्यामुळे मदत नको पण डुक्कर आवर असे शेतकरी म्हणत आहे..
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






