मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरट्यास चाळीसगांव शहर पोलीसांनी केले जेलबंद

Spread the love

चाळीसगांव :- शहरातील सिग्नल चौक परीसरातील मोटारसायल चोरी झाल्याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्याने मा. श्री.एम. राजकुमार सो. पोलीस अधिक्षक यांचे तसेच मा. अपर पोलीस अधिक्षक सो. श्री रमेश चोपडे व मा. सहा. पोलीस अधिक्षक सो. श्री अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे पोलीस निरीक्षक, संदीप पाटील यांनी एक विशेष पथक तयार करुन,

पथकातील अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक श्री सागर ढिकले, पोलीस उपनिरीक्षक, सुहास आव्हाड व पोलीस अंमलदार पोना/राहुल सोनवणे, पोना/महेंद्र पाटील, पोना/भुषण पाटील, पोकॉ/ आशुतोष सोनवणे, पोकॉ/रविंद्र बच्छे, पोकाँ/ पवन पाटील,पोकॉ/राकेश महाजन, पोकॉ/समाधान पाटील, पोकॉ/ विजय पाटील, पोकॉ/ज्ञानेश्वर पाटोळे अशांनी सदर गुन्ह्यातील आरोपीताचा कसुन शोध घेतला असता, पोकॉ/ विजय पाटील व पोना/भुषण पाटील यांना दिनांक 08/09/2023 रोजी कजगांव ता. भडगांव येथील एक अनोळखी इसम संशयीत रित्या मिळुन आल्याने

तसेच तो मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील सी.सी.टी.व्ही. फुटेज प्रमाणे मिळते जुळते वर्णनाचे असल्याचा संशय बळावल्याने सदर इसमास ताब्यात घेवुन अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे नाव मोहसिन शेख कादर मनियार वय 32 वर्षे रा. कजगांव ता. भडगांव असे असल्याचे सांगुन त्याने चाळीसगांव शहर पो.स्टे. गुरनं. 446/2023 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्ह्यातील 20,000/- रुपये किमतीची मोटारसायकल चोरुन नेल्याची कबुली देवुन सदरची मोटारसायकल काढुन दिलेली आहे. नमुद आरोपीतास वर नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आलेले असुन सदर गुन्ह्याचा तपास पोहेकॉ/योगेश बेलदार व पोकॉ/निलेश पाटील हे करीत आहेत.

तरी रात्रीच्या वेळी आणखी अश्याच प्रकारचे गुन्हे घडु नये म्हणुन रहिवाश्यांनी रात्रीच्या वेळी त्यांच्या घरासमोरील लाईट चालु ठेवावे. तसेच कॉलनीतील नागरिकांनी त्यांच्या कॉलनीत सी.सी.टी.व्ही. बसविण्याबाबत चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन तर्फे आव्हाण करण्यात येत आहे. जेणे करुन चोरीच्या गुन्ह्यांना कायम स्वरुपी पायबंद घालण्यास मदत होईल.

हे पण वाचा

टीम झुंजार