एरंडोल :- तालुक्यातील उत्राण गु.ह.येथील महिलेने कंपनीच्या एच.आर.यांनी येथील कंपनीच्या महिला ठेकेदार यांच्याशी कंपनीच्या महिला कर्मचारी महिलेचे आमच्या कडे अश्लील फोटो आहेत.ती महिला कंपनीला कॅन्सर आहे.अशा महिलांना कामावर आणायचे नाही.
तुम्ही इतर महिलांची लाईन लावतात माझी पण लाईन लावा मला हि एखादी महिला पुरवा अशी लज्जा निर्माण होईल अशी भाषा वापरून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. कंपनीचे एच.आर.राजेश जगन्नाथ घोरपडे यांच्याविरुध्द कासोदा पोलिसात संबंधित महिलेने तक्रार दाखल केली आहे.
महिला ठेकेदार ह्या दि.१२ रोजी एच.आर.यांच्या कॅबिन मध्ये गेली संबंधित महिला आली आहे.तुमच्याकडे काय पुरावा आहे ती मागत आहे.तेव्हा एच आर. घोरपडे यांनी सांगितले माझ्याकडे काहीच पुरावा नाही.जळगाल येथे मॅनेजमेंन्ट कडे आहे . मला कामावरून का काढले असा जाब विचारला असता संबंधित एच.आर.घोरपडे यांनी संबंधित महिलांना तुमच्या ने जे होईल ते करा मी कोणालाही भित नाही.
अशी धमकी दिली म्हणून गावातील काही लोकांना घेऊन कासोदा पोलिसात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नितीन सुर्यवंशी हे तपास करीत आहे. दरम्यान या घटनेमुळे या नामांकित कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






