यावल : येथील महाविद्यालयात एका अल्पवयीन मुलीचा शहरातील एका तरुणाने पाठलाग करून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला सदर प्रकार या मुलीने कुटुंबात सांगितल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध पोस्को सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
यावल शहरात फैजपूर रस्त्यावर असलेल्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहे या महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा यावल शहरातील विस्तारित भागातील रहिवाशी एका तरुणाने सतत पाठलाग केला व तरुणीस महाविद्यालयात जावुन मी तुझा पाठलाग करेल, तुझ्या घरी येईल सह अल्पवयीन मुलीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आणि तू जास्त बोलली तर तुला महाविद्यालयाच्या बिल्डिंगवरून खाली फेकून देईल अशी धमकी दिली
तेव्हा या अल्पवयीन मुलीने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबांना सांगितला. तेव्हा या अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात यावल शहरातील तरुणाविरुद्ध बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण अधिनियम पोस्को सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश दहिफळे करीत आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






