जालना: नळाचं पाणी भरत असताना विजेचा धक्का लागून विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भोकरदन शहरात घडली आहे. नम्रता संदीप सुरडकर असे या मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. नम्रताच्या अकाली मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
नळाला आज सकाळी पाणी आल्यानंतर नम्रताने पाणी भरण्यासाठी विद्युत मोटर सुरू केली. नम्रता नळावरून पाणी भरत होती. याचदरम्यान तिचा तिथे पडलेल्या इलेक्ट्रिक वायरला स्पर्श झाला. इलेक्ट्रिक वायरला स्पर्श होताच तिला विजेचा जोरदार धक्का बसला.
नम्रता हिला तत्काळ शहरातील एक खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषीत केले. नम्रताच्या अकाली निधनामुळे गावावर शोककळा पसरली आहे. नम्रता दहावीच्या वर्गात शिकत होती. पोलिस पुढील तपास करत आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






